टेक डेस्क - 'LG K४२' ला भारतात क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि ४,००० mAh बॅटरीसह लाँच करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा बजेट फोन मिलिट्री-ग्रेड MIL-STD-८१०G सर्टिफाइड बिल्डसह उपलब्ध आहे. युएस मिलिट्री डिफेन्स स्टॅन्डर्डच्या ९ निरनिराळ्या प्रकाराच्या कम्पलायन्स टेस्टिंग या फोनने पास केलेल्या आहेत. यामध्ये हाय-लो टेम्पेरेचर, शॉक, व्हायब्रेशन, टेम्परेचर शॉक आणि ह्यूमिडिटी यासारख्या टेस्ट्सचा समावेश आहे.
या फोनच्या ३GB+६४GB व्हेरिएंटची किंमत १०,९९० रुपये आहे. ग्राहकांना हा फोन 'फ्लिपकार्ट' या ई-कॉमर्स साइटवरुन खरेदी करता येणार आहे. ग्रे आणि ग्रीन या दोन कलर्सचे पर्याय कस्टमर्ससाठी उपलब्ध आहेत . यासह ग्राहकांना २ वर्षांची एक्सटेंडेट वॉरंटी आणि एका वर्षासाठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटचा लाभ घेता येणार आहे.
डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा फोन अँड्राइड १० बेस्ड LG UX वर रन करता येतो. यामध्ये ६.६ इंच HD+ (७२०x१,६०० पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३GB रॅमसह ऑक्टा-कोर MediaTek Helio P२२ प्रोसेसर देण्यात आलेले आहे.
फोटोग्राफी लव्हर्ससाठी यामध्ये रिअर १३ MP प्रायमरी सेंसर, ५ MP अल्ट्रा वाइड अँगल सेंसर, २ MP डेप्थ सेंसर आणि २ MP मॅक्रो सेंसर असणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॅप्चरिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये ८ MP कॅमेरा देण्यात आलेला आहे. या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये विविध फंक्शन्स देण्यात आले आहेत. एकप्रकारे असे म्हणता येईल की फोटोलव्हर्ससाठी या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये बरेच फंक्शन्स व ऑप्शन्स आहेत.
कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ४G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v५.0, GPS/ A-GPS आणि एक USB टाईप-C पोर्टचा सपोर्ट आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर साईड माउंटेड आहे. यासह महत्वाचे म्हणजे या मोबाईलमध्ये डेडिकेटेड गूगल असिस्टन्ट बटणची सुविधाही असणार आहे.