मुंबई - अचानक जिओचा डाटा संपल्यानंतर रिचार्ज कसे करायचे असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? यावर आता नक्कीच उत्तर आहे. भारतामधील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने ग्राहकांकरिता इमर्जन्सी डाटा (emergency data loan) लोनची सुविधा जाहीर केली आहे. या सुविधेमुळे जिओच्या ग्राहकांना त्वरित डाटा पूर्ववत सुरू ठेवता येणार आहे.
इमर्जन्सी डाटा लोन म्हणजे काय?
इमर्जन्सी डाटा लोनच्या सुविधेमुळे ग्राहकांना आता रिचार्ज मिळवा आणि नंतर पैसे भरा असा पर्याय मिळतो. जिओचा डाटा संपल्यानंतर त्वरित रिचार्ज करणे शक्य होत नाही. अशावेळी ग्राहक रिचार्ज करून नंतर पैसे भरू शकतात. जिओ ग्राहकांना १ जीबी आणि ११ रुपयांचे ५ इमर्जन्सी प्लॅन उपलब्ध करून देणार आहे.
हेही वाचा-'तालिबानी' शिक्षा! वडील आणि भावाकडून तरुणीला काठीने बेदम मारहाण
असा मिळवा इमर्जन्सी डाटा प्लॅन
1. मायजिओ अॅप सुरू करा. त्यामध्ये डावीकडे टॉपवर मेन्यू निवडा.
2. मेन्युमधील एमर्जन्सी डाटा लोन हा पर्याय निवडा. त्याखालोखाल मोबाईल सर्व्हिसेसमध्ये एमर्जन्सी डाटा लोन मिळवा.
3. डाटा लोन बॅनर असलेल्या प्रोसीडवर क्लिक करा.
4. Get emergency data हा पर्याय निवडा.
5. Activate now वर क्लिक करा.
6. आता तुम्हाला मोबाईलमध्य इमजर्न्सी डाटा मिळेल.
हेही वाचा-दोन विवाह झालेला अन् १६ वर्षीय मुलीचा बाप असलेला कराटे शिक्षक १८ वर्षाच्या तरुणीसोबत 'लिव इन'मध्ये