बीजिंग - ओप्पोने नव्या पिढीतील रेनो ५ श्रेणी लाँच केली आहे. यामध्ये रेनो ५ जी, रेनो ५जी प्रो ५ जी आणि रेनो ५ + ५जी यांचा आहे. यामध्ये कंपनीने चौथे मॉडेल रेनो ५ ४जीचा समावेश आहे. रेनो ५ ४जी हे मॉडेल व्हिएतनाममध्ये लाँच केले आहे.
स्मार्टफोनची किंमत ८६,९०,००० व्हिएतनामीज (अंदाजे २७,२११ रुपये) आहे. कंपनीने रेनो ४जी हे इंडोनिशियामध्ये १२ जानेवारीला लाँच करणार आहे.
हेही वाचा-नववर्षाच्या उंबरठ्यावर जिओची भेट; सर्व नेटवर्क कॉलिंग मोफत!
ही आहेत स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये-
- स्मार्टफोन ६.४ इंचचा एएमओएलईडी डिस्पले आहे. त्यामध्ये फुल एचडी आणि २४००X१०८० स्क्रीन रिझोल्यूशन आहे.
- क्वालकोम्न स्नॅपड्रॅगन ७२०जी चीपसेट प्रोसेसर आहे. तर ४जी एलटीई कनेक्टिव्हिटी आहे.
- स्मार्टफोनला ८जीबी एलपीडीडीआर४X रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोअरेज आहे.
- फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. तर ४४ मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि ८ मेगापिक्सेलचा सुपरवायडर लेन्स आहे. तर २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्से मोनोक्रोम सेन्सर आहे.
- पुढील बाजुला ४४ मेगापिक्सेलचा सेल्फी स्नॅपर आहे.
- डिव्हाईसला ४३१० एमएएच बॅटरी आहे. पहिल्या पिढीतील ५० वॅटर सुपर व्हीव्हीओसी हे वेगवान चार्जिंग करणारे तंत्रज्ञान आहे.
- ओप्पो रेनो ५ ४जीमध्ये अँड्राई ११ ऑपरेटिंग सिस्टिम आहे. हे ५जी प्रमाणे मॉडेल आहे.
हेही वाचा-फ्लिपकार्टसह अॅमेझॉनवर कारवाईचे ई़डीला केंद्राकडून आदेश