नवी दिल्ली - व्हॉट्सअपने नवे गोपनीयतेचे धोरण १५ मेपर्यंत स्थगित केले आहे. व्हाट्सअपला वापरकर्त्यांचा डाटा व्यावसायिक उपयोगासाठी फेसबुक पालक कंपनीकडे ठेवायचा आहे. मात्र, केंद्र सरकारने या धोरणाला विरोध करत व्हॉट्सअपचे सीईओ विल कॅथकार्ट यांना पत्र पाठविले आहे.
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग म्हणाले की, कंपनीने अपडेट करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. सर्व मेसेज हे एनक्रिप्टेड असतात. त्यामुळे हे मेसज वापरकर्त्यांशिवाय कधीही कुणालाही दिसत नाहीत. तर बिझनेस मेसेज हे पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. बिझनेस अपला जोडण्यासाठी नवे फीचर तयार करत असल्याचे फेसबुकचे सीईओ झुकेरबर्ग यांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षितपणे वापरकर्त्यांचा डाटा सुरक्षित ठेवणे शक्य होईल, असेही झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-नागरिकांचा खासगीपणा जपणे ही सरकारची जबाबदारी
जगभरात १७.५ कोटी लोक बिझनेस व्हॉट्सअपचा वापर करतात. दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सअपचे गोपनीयतेचे धोरण मागे घेण्यासाठी याचिका दाखल आहे.
काय आहे व्हॉट्सअपच्या अपडेटचा वादग्रस्त मुद्दा?
केंद्र सरकारने व्हॉट्सअपला गोपनीयतेचे धोरण काढण्याची सूचना केल्यानंतर कंपनीने भूमिका स्पष्ट केली आहे. प्रस्तावित गोपनीयेतच्या धोरणातून वापरकर्त्यांचा डाटा फेसबुकशी वापर करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही. त्या मुद्द्याबाबत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी खुले असल्याचे कंपनीने यापूर्वीच म्हटले आहे. व्हाट्सअपकडून डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार होते. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. फेसबुकच्या अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.
हेही वाचा-व्हॉट्सअप हे भारतीय वापरकर्त्यांबाबत पक्षपाती; केंद्राचा उच्च न्यायालयात दावा