सॅनफ्रान्सिस्को- कोरोनाच्या काळात घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा झुम या व्हिडिओ अॅपला महसुलात चांगलाच फायदा झाला आहे. झुमला मिळणाऱ्या तिमाही उत्पन्नात ३६९ टक्क्यांची वाढ झाली आहे. झुमने तिमाहीत ८८२.५ दशलक्ष डॉलरचे उत्पन्न मिळविले आहे.
झुमचे संस्थापक आणि सीईओ एरिक एस. युआन म्हणाले की, ग्राहकांनी कोणत्याही वातावरणात काम करण्याची सेवा देताना आम्हाला विश्वासू भागीदार म्हणून भूमिका करताना आनंद होत आहे. आमची वेगाने प्रतिसाद देण्याची क्षमता आहे. आम्ही आर्थिक वर्ष २०२२ मध्ये प्रवेश केला आहे. नवीन संशोधनात्मक व्हिडिओ संवाद माध्यमात वेगाने प्रगती करण्यावर आमचा विश्वास आहे. आम्हाला ग्राहकांची संख्या वाढविण्यात, सेवा सुरू ठेवण्यात आणि त्यांचे व्यवसाय वाढविण्यासाठी बांधील आहोत. कंपनी आर्थिक वर्ष २०२१ मध्ये एकूण २,६५१.४ दशलक्ष डॉलरचे उत्पन्न मिळविले आहे. ही व्यवसायातील वाढ गतवर्षीच्या तुलनेत ३२६ टक्क्यांनी जास्त आहेत. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ९०० दशलक्ष ते ९०५ दशलक्ष डॉलर व्यवसाय होईल, असा अंदाज आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ६७९ रुपयांची घट ; चांदी १,८४७ रुपयांनी स्वस्त
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये आम्ही अत्यंत महत्त्वाचे संवाद उपलब्ध करून व्यवसायात लक्षणीय वाढ केली आहे. ग्राहकांना आणि जागतिक समुदायाला कोरोनाच्या काळात प्रतिसाद म्हणून सेवा दिल्याचेही युआन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-शेअर बाजाराने गाठला पुन्हा ५०,००० चा टप्पा; आयटीचे शेअर तेजीत!
व्हिडिओ मीटिंग झुमने जगभरातील वापरकर्त्यांना 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' मोफत देण्याचे ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर केले आहे. ही सुविधा मीटिंगमध्ये सहभागी होणाऱ्या २०० जणापर्यंत मिळू शकत आहे. मोफत एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनची सुविधा हा तत्काळ उपलब्ध होणार असल्याचे झुम कंपनीने म्हटले होते. त्यासाठी वापरकर्त्यांकडून ३० दिवसापर्यंत फीडबॅक अपेक्षित असल्याचे झुमचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी जेसन ली यांनी सांगितले होते.