नवी दिल्ली - केंद्र सरकारने व्हॉट्सअपला प्रस्तावित गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्यावर पुनर्विचार करण्यास सूचविले आहे. ही माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री संजय धोत्रे यांनी लोकसभेत दिली.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअपच्या नव्या गोपनीयतेच्या धोरणाची दखल घेतल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री संजय धोत्रे यांनी सांगितले. भारतीय वापरकर्त्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी मंत्रालयाने व्हॉट्सअपला गोपनीयतेच्या धोरणाबाबत फेरविचार करण्यास सूचविले आहे. त्यामध्ये एकसमानता असल्याचे स्पष्ट करावे, असेही मंत्रालयाने फेसबुकला सांगितल्याचे केंद्रीय मंत्री धोत्रे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तरात सांगितले आहे.
हेही वाचा-नागरिकांचा खासगीपणा जपणे ही सरकारची जबाबदारी
व्हॉट्सअपने १५ मेपासून गोपनीयतेच्या धोरणात बदल केल्याचे जाहीर-
व्हॉट्सअपने १५ मेपासून गोपनीतयतेच्या धोरणात बदल करण्याचे जाहीर केले आहे. व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्याचे जाहीर केल्यावर भारतासह जगभरातून फेसबुक कंपनीवर टीका करण्यात आली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्यांकडे सामाई केला जाईल, अशी जगभरातील वापरकर्त्यांमध्ये भीती आहे. असे असले तरी व्हॉट्सअपवरील संदेश हे इन्ड-टू-इन्ड इन्क्रिप्टेड असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या फेसबुकने जाहीर केले होते.
हेही वाचा-व्हॉट्सअप हे भारतीय वापरकर्त्यांबाबत पक्षपाती; केंद्राचा उच्च न्यायालयात दावा
काय आहे व्हॉट्सअपच्या अपडेटचा वादग्रस्त मुद्दा?
केंद्र सरकारने व्हॉट्सअपला गोपनीयतेचे धोरण काढण्याची सूचना केल्यानंतर कंपनीने भूमिका स्पष्ट केली आहे. प्रस्तावित गोपनीयेतच्या धोरणातून वापरकर्त्यांचा डाटा फेसबुकशी वापर करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही. त्या मुद्द्याबाबत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी खुले असल्याचे कंपनीने यापूर्वीच म्हटले आहे. व्हाट्सअपकडून डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार होते. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. फेसबुकच्या अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.