ETV Bharat / lifestyle

ट्विटरकडून क्लबहाऊस 4 अब्ज डॉलरला खरेदी करण्याचे प्रयत्न,पण... - क्लबहाऊस

क्लबहाऊस आणि ट्विटरमध्ये सौद्यासाठी बोलणी झाल्याचे एका तंत्रज्ञानविषयीच्या माध्यमाने म्हटले आहे. अनेक महिने बोलणी होऊनही मात्र मार्ग निघाला नसल्याचे या माध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे.

Twitter
ट्विटर न्यूज
author img

By

Published : Apr 8, 2021, 7:33 PM IST

सॅनफ्रान्सिस्को- समाज माध्यम कंपन्यांकडून नेहमीच लहान पण प्रतिस्पर्धी ठरू शकणाऱ्या कंपन्यांचे अधिग्रहण करण्याकडे कल असतो. ट्विटरला स्पर्धा करू पाहणाऱ्या क्लबहाऊस या ऑडिओ अॅपला विकत घेण्याचा ट्विटरचा प्रयत्न होता. मात्र, हा 4 अब्ज डॉलरचा सौदा फिसकटला आहे.

क्लबहाऊस आणि ट्विटरमध्ये सौद्यासाठी बोलणी झाल्याचे एका तंत्रज्ञानविषयीच्या माध्यमाने म्हटले आहे. अनेक महिने बोलणी होऊनही मात्र मार्ग निघाला नसल्याचे या माध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा 182 रुपयांची वाढ

  • क्लबहाऊसची लोकप्रियता वाढत असल्याने ट्विटरने क्लबहाऊस प्रमाणेच स्पेसेस या सेवेची अँड्राईडवर चाचणी सुरू केली आहे.
  • ट्विटर स्पेसेस टूल हे सध्या आयओएस बीटामध्ये उपलब्ध आहे. मात्र, अद्याप अँड्राईडवर सुरू झालेले नाही.
  • स्पेस या टूलमध्ये वापरकर्त्याबरोबर फॉलोअर्स हे संवाद साधू शकतात. हा संवाध कोणीही ट्विटर ऐकू शकतात. या संवादावर केवळ यजमान (होस्ट) नियमंत्रण ठेवू शकतो.
  • सध्या, क्लबहाऊस हे केवळ अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅपचे 80 लाख डाऊनलोड झाले आहेत. कंपनीकडून अँड्राईडसाठी चाचणी सुरू आहे.

हेही वाचा-मुकेश अंबानी सेबीच्या दंडाविरोधात दाखल करणार अपील

क्लबहाऊसशी या कंपन्याही करणार स्पर्धा-

  • क्लबहाऊसबरोबरील स्पर्धेत फेसबुकही आहे. फेसबुककडून क्लबहाऊसप्रमाणे समाज माध्यम ओडिओ अॅपची चाचणी सुरू आहे.
  • लिंक्डइनची मालकी असलेल्या मायक्रोसॉफ्टकडूनही ओडिओ अॅपची चाचणी सुरू आहे. कंपनीने म्हटले आहे, व्यावसायिक ओळख निश्चित करण्यासाठी अद्वितीय असा ओडिओ अनुभव वापरकर्त्यांना मिळणार आहे. त्यासाठी आम्ही चाचणी घेत आहोत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.