ETV Bharat / lifestyle

युट्यूबमधील 'शॉर्ट्स' व्हिडिओकरता 'या' कंपनीचे मिळणार मोफत संगीत - युट्यूब शॉर्ट्स

युट्युब शॉर्टस ही गुगलने नुकतेच सुरू केलेली शॉर्ट व्हिडिओ सेवा आहे. त्यामध्ये वापरकर्ते, क्रियटर आणि आर्टिस्टला युट्युबवर शॉर्ट व्हिडिओ तयार करता येतात. टिप्सचा गुगलबरोबर करार झाल्याने वापरकर्त्यांना टिप्सचे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले संगीत उपलब्ध होणार आहे.

युट्यूब
युट्यूब
author img

By

Published : May 13, 2021, 3:11 PM IST

नवी दिल्ली - युट्यूबवर व्हिडिओ तयार करताना कॉपीराईट कायद्याचा भंग न टाळता चांगले संगीत मिळविणे वापरकर्त्यांना कठीण जाते. ही अडचण आता काही प्रमाणात कमी होणार आहे. कार म्युझिक रेकॉर्ड कंपनी टिप्स इंडस्ट्रीजने गुगलला संगीत परवाना देण्याचा करार केला आहे. त्यामुळे युट्युबरला शॉर्ट्सचे व्हिडिओ तयार करताना टिप्सचे संगीत व गाणे वापरता येणार आहेत. त्यामुळे कॉपीराईटचा भंगही होणार नाही.

युट्युब शॉर्टस ही गुगलने नुकतेच सुरू केलेली शॉर्ट व्हिडिओ सेवा आहे. त्यामध्ये वापरकर्ते, क्रियटर आणि आर्टिस्टला युट्युबवर शॉर्ट व्हिडिओ तयार करता येतात. टिप्सचा गुगलबरोबर करार झाल्याने वापरकर्त्यांना टिप्सचे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले संगीत उपलब्ध होणार आहे. टिप्स लायब्ररीमध्ये विविध भाषांमध्ये उपलब्ध असलेले गाणी आणि संगीत उपलब्ध आहेत. टिप्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक कुमार तौरानी म्हणाले, की भागीदारीमुळे क्रियटर आणि वापरकर्त्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा-'पीएम केअर्स' फंडातले व्हेंटिलेटर कुठायत? काही निकामी, तर काहींसाठी तंत्रज्ञच नाही...

फेसबुकबरोबर टिप्सचा डिसेंबरमध्ये करार-

गतवर्षी टिप्स इंडस्ट्रीजने फेसबुकबरोबर संगीत परवान्यासाठी करार केल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे वापरकर्त्यांना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ तयार करण्यासाठी टिप्सचे संगीत आणि व्हिडिओ विना कॉपीराईट वापरता येत आहे. सारेगामा इंडियानेही फेसबुकबरोबर म्युझिक संगीत परवान्यासाठी करार केला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना सारेगामा इंडियाचे संगीत व व्हिडिओ वापरता येणार आहेत.

यूट्यूब शॉर्टचे असतात १५ सेकंदाचे व्हिडिओ

यूट्यूब शॉर्टसमधून १५ सेकंद किंवा त्याहून कमी सेकंदाच्या व्हिडिओचा अनुभव घेणे शक्य होते. क्रिएटर आणि कलावंत हे स्मार्टफोनचा वापर करून व्हिडिओ तयार करू शकतात. यूट्यूबकडून बिटा व्हर्जनमध्ये मल्टी सेगमेंट कॅमेरा, मल्टीपल व्हिडिओ क्लिप्स देण्यात येत आहेत. तसेच क्रियटरला म्युझिक लायब्ररीमधून विविध गाणी, संगीत निवडण्याचे अगणित पर्याच उपलब्ध होतात.

हेही वाचा-टिप्स इंडस्ट्रीजचे संगीत व व्हिडिओ फेसबुकसह इन्स्टाग्रामवर वापरता येणार; दोन्ही कंपन्यांमध्ये करार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.