टेक डेस्क - फेसबुकच्या मालकीचे फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामने स्वत:ला नुकसान पोहोचवण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आणि आक्षेपार्ह पोस्टसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामने सांगितले, की ते आपल्या प्लॅटफॉर्मसाठी लवकरच नवी कटेंट पॉलिसी तयार करणार आहेत. एक ब्रिटिश मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी इन्स्टाग्राम तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
कुटुंबीयांनी आरोप केला आहे, की इन्स्टाग्रामवर स्वत:ला नुकसान पोहोचवणाऱ्या फोटो आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे कंटेंट दाखवण्यात येत आहे. दरम्यान इन्स्टाग्रामने किशोरवयीन मुलीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मुसेरीने मीडियाशी बोलताना सांगितले, की कंपनीने सेन्सिटिव्ह स्क्रीन्स फिचर सुरू केले आहे. यानंतर इन्स्टाग्राम युझरच्या टाईमलाईनवर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे आणि हिंसक कटेंट पूर्वीपेक्षा धूसर (अस्पष्ट) दिसणार आहे. मात्र युझर त्यावर क्लिक करुन कंटेंट बघू शकणार आहेत.
हा फिचर फेसबुक हिंसक कंटेंटसंदर्भात जसे काम करते अगदी तसेच काम करणार. इन्स्टाग्राममध्ये हा बदल तेव्हा आला आहे जेव्हा इंग्लंडचे स्वास्थ्य सचिव मॅट हँकॉकने फेसबुक, गुगल आणि व्हॉट्सअॅप सारख्या कंपन्यांना निर्देश दिलेत, की त्यांनी स्वत:ला नुकसान पोहोचवणाऱ्या पोस्ट, फोटो, व्हिडिओ आणि हॅशटॅगपासून तरुणाईचे संरक्षण व्हावे यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलावे.
उल्लेखनीय म्हणजे ब्रिटिश किशोरवयीन मुलगी मोईली रसेलने २०१७ मध्ये तिच्या खोलीत आत्महत्या केली. केवळ १४ वर्षाच्या या मुलीचे सोशल मीडिया अकाउंट्स तपासल्यावर ती नैराश्य आणि आत्महत्येशी संबंधित अकाउंट्स फॉलो करायची असे समोर आले.