टेक डेस्क - अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम बनवणारी कंपनी Google ने Play Store वरुन २८ फेक अॅप्स हटवले आहेत. हे अॅप्स Quick Heal सिक्युरिटी लॅबच्या निर्देशानंतर हटवण्यात आले आहेत. Quick Heal नुसार हे अॅप्स एकाच डेव्हलपरद्वारे डेव्हलप करण्यात आले आहेत. या अॅप्समध्ये व्हर्च्युल डेटा, मिनी वॉलेट, गोल्ड लोग, लव्ह लिफाफा, चिट फंड सारख्या अॅपचा समावेश आहे.
Quick Heal लॅबच्या पोस्टनुसार या अॅप्सचे फंक्शन नावानुसार नाहीत. उदाहरणार्थ जर कोणत्या अॅपचे नाव क्रेडिट कार्ड प्रोसेस आहे मात्र या अॅपमध्ये क्रेडिट कार्डशी संबंधित सुविधा युजर्सला मिळत नाहीत. असे एकूण २८ अॅप्स आहेत ज्यांचे नाव त्यांच्या कामाशी मेळ खात नाही. उल्लेखनीय म्हणजे हे अॅप्स हजार वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत. अनेक युजर्सनी हे अॅप्स डाउनलोड केल्यानंतर कमेन्ट पण केल्या आहेत.
Quick Heal ने युजर्सला सावध करताना म्हटले आहे, की कोणताही अॅप गुगल प्ले स्टोरवरुन डाउनलोड करताना सर्वप्रथम त्याचे डिस्क्रिप्शन नक्की वाचा. या व्यतिरिक्त अॅपचे रिव्यू आणि डेव्हलपर्सचे नाव चेक करा. यासह युजर्सचे कमेन्टही वाचा. थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करणे प्रामुख्याने टाळा. जर तुम्ही हे अॅप्स डाउनलोड केले असतील तर ते रिमूव्ह (अनइन्स्टाल) करा.