नवी दिल्ली - जर तुम्ही अँड्राईड डिव्हाईसवर गुगल फोन अॅप वापरत असाल तर तुम्हाला कोण कॉल करत हे ऐकणे शक्य होणार आहे. गुगलने हे फीचर फोन अॅपमध्ये उपलब्ध केले आहे. तुम्हाला इनकमिंग येत असताना हे अॅप कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि नंबर सांगेल.
गुगल फोन अॅपने नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरमध्ये कॉलिंग करणाऱ्या व्यक्तीचे नावही वापरकर्त्याला स्क्रीनवर दिसू शकणार आहे. सध्या, अमेरिकेतील पिक्सेल फोनच्या वापरकर्त्यांना केवळ कॉलिंग करणाऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकते. हे टूल लवकरच इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा-एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ
असे वापर फीचर-
- वापरकर्त्याला कॉलरचे नाव हे नेहमी दिसण्याचा अथवा इअरफोन असल्यास दिसण्याचा पर्याय निवडता येतो.
- ही फीचर सुरू करण्यासाठी गुगल अॅमध्ये सेटिंग्जमध्ये जाऊन कॉलर आयडी अनाउन्समेंटचा पर्याय निवडावा लागणार आहे.
- यापूर्वीच आयओएस डिव्हाईसवर कॉलर आयडीचे फीचर उपलब्ध आहे.
- कॉलर आयडी अनाउन्समेंटमुळे दृष्टीहीन व्यक्तींना फोन कोणाचा आला आहे, हे समजणे सोपे ठरणार आहे.
हेही वाचा-एलॉन मस्क असल्याचे भासवित क्रिप्टोकरन्सीमध्ये २ दशलक्ष डॉलरची फसवणूक