ETV Bharat / lifestyle

अँड्राईडवरील क्रोममध्ये मिळणार स्क्रीनशॉट टूल; वेबपेज शेअर करणे होणार सोपे - स्क्रीनशॉट टूल

मोबाईलमध्ये वापरकर्त्यांना इन बिल्ट स्क्रीनशॉटचे टूल मिळते. त्याप्रमाणे अँड्राईडवरून क्रोमचा वापर करतानाही स्क्रीनशॉटचे टूल हे वापरकर्त्यांना मिळणार आहे.

Chrome
क्रोम
author img

By

Published : Jun 1, 2021, 5:46 PM IST

सॅनफ्रान्सिस्को - गुगल क्रोमकडून सातत्याने वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर देण्यात येतात. अँड्राईडवर क्रोमचा वापर करणाऱ्यांसाठी खास फिचर सुरू करण्यात आले आहे. अँड्राईडवर क्रोम ९१ च्या वापरकर्त्यांना स्क्रीनशॉट टूल देण्यात आले आहे. त्यामधून ओम्नीबॉक्ससह सर्व फोटो कापणे, मजकूर टाकणे टाणे शक्य आहे.

मोबाईलमध्ये वापरकर्त्यांना इन बिल्ट स्क्रीनशॉटचे टूल मिळते. त्याप्रमाणे अँड्राईडवरून क्रोमचा वापर करतानाही स्क्रीनशॉटचे टूल हे वापरकर्त्यांना मिळणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना गुगलवरील वेबसाईटचा स्क्रीनशॉट काढण्यासाठी मोबाईलचे टूल वापरता गुगल क्रोममधील टूल वापरता येणार आहे. गुगल क्रोममधील स्क्रीनशॉटच्या टूलमुळे वेबपेज शेअर करता येणार आहे.

हेही वाचा-कोरोनात दिलासा : टीव्हीएस ग्रुपकडून तामिळनाडूला ८ कोटी रुपयांची मदत

क्रोम ९१ हे गेल्या आठवड्यात लाँच
क्रोम ९१ हे गेल्या आठवड्यात अँड्राईडवर नवीन लाँच झाले आहे. त्यामध्ये शेअर मेन्यूत स्क्रीनशॉट टूल देण्यात आलेले आहे. हे क्रोम विविध डिव्हाईसवर आहे. क्रोमचे व्हर्जन ८५ पासून गुगलने पेज नाव, यूआरएल आणि फेव्हिकॉनमध्ये बदल केले. नुकतेच गुगलने अँड्राईडवरी क्रोममध्ये कॉपी लिंक, इतर साधनांवर शेअर करण्याचा पर्याय व प्रिंट हे पर्याय उपलब्ध केले होते.

हेही वाचा-दिलासादायक! स्पूटनिक व्हीचे ३० लाख डोस हैदराबादमध्ये दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.