नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून वेगवेगळ्या भागात दमदार मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली असून, जमिनीत ओल निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये ७ जून नंतर राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. तीन दिवसांपासून झालेला पाऊस पेरणी योग्य नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बसत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतीच्या कामाला वेळ दिला असून शेती तयार करण्याचे काम शेतकरी वर्गाकडून केले जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेला पाऊस हा शेती उपयोगी नसून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. यंदा खरीप हंगामात नंदुरबार जिल्ह्यात २ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या खते आणि बियाणे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी योग्य वानाचे बियाणे खरेदी करावे, जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर खत आहे तरी शेतकऱ्यांनी खताचा साठा करू नये आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कृषी विभागाशी संपर्क साधून पेरणीबाबत योग्य ते मार्गदर्शन घ्यावे, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे.