ETV Bharat / jagte-raho

पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर 2 लाखांची रोखड लंपास, अशी केली चोरी

सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर चोरट्याने चोरी करून दोन लाखांची रोखड लंपास केली आहे. गुरुनानक चौक येथे साई मोटर्स नावाचे दुकान आहे. या दुकानामधून जुन्या वाहनांची खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो. जहांगीर नदाफ असे दुकान चालकाचे नाव असून त्यांनी वाहन विकलेली रक्कम दुकानात ठेवली होती. ती चोरट्याने पळवली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Two lakh cash theft near from the office of the Commissioner of Police
पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर दोन लाखांची रोखड लंपास
author img

By

Published : Aug 27, 2020, 4:50 PM IST

Updated : Aug 27, 2020, 4:57 PM IST

सोलापूर - सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर चोरट्याने चोरी करून दोन लाखांची रोखड लंपास केली आहे. येथे दुसऱ्यांदा चोरी झाल्याने आजूबाजूच्या दुकान धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गणेश चतुर्थीच्या आगमना वेळी सोलापूर शहरमधील सहा दुकाने फोडून जवळपास 40 लाखांचे मोबाईल चोरी झाले होते. ही घटना ताजी असताना गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ पुन्हा चोरी झाली आहे. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

गुरुनानक चौक येथे साई मोटर्स नावाचे दुकान आहे. या दुकानामधून जुन्या वाहनांची खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो. जहांगीर नदाफ असे दुकान चालकाचे नाव आहे. बुधवारी एका जुन्या चार चाकी वाहनाची खरेदी झाली होती. साई मोटर्सचे दुकान मालक हे या व्यवहारात कमिशन एजंट म्हणून भूमिका बजावली होती. या व्यवहारातून सव्वा दोन लाख रुपये जहांगीर नदाफ यांनी घेतले होते. ती रक्कम बुधवारी रात्री घरी घेऊन न जाता दुकानामधील तिजोरीत ठेवली होती. रात्री 9 च्या सुमारास जहांगीर नदाफ यांच्या मुलाने दुकान बंद केले आणि तो घरी गेला. सव्वा दोन लाखांची रक्कम दुकानातच ठेवली होती. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरटा दुचाकी वाहन घेऊन दुकानासमोर आला. दोन वेळा घिरट्या मारून त्या चोरट्याने दुचाकी वाहन साई मोटर्स समोर थांबविले. त्यानंतर त्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आत मध्ये येताच त्याने कॅमेरा फिरवला आणि दोन लाखांची चोरी केली.

पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर दोन लाखांची रोखड लंपास...
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आजूबाजूच्या दुकानधारकांनी साई मोटर्स दुकानाचे मालक जहांगीर नदाफ यांना फोन करून कळविले की, तुमच्या दुकानाचे कुलूप तोडले आहे, दुकानात चोरी झाली आहे का, ते पहा, त्यावेळी त्यांनी घाई गडबडीत सकाळी साडे-दहाच्या सुमारास दुकान गाठले आणि पाहणी केली असता दुकानातील तिजोरी फोडली होती. जहांगीर नदाफ यांनी ताबडतोब सदर बझार पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती कळविली.

पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील दुकानात चोरी झाली असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून पंचनामा केला. बोटांचे ठसे घेणारे पथक देखील दाखल झाले. श्वान पथक आले. श्वानाला तोडलेले कुलूप याचा वास देण्यात आला. परंतु चोरीचा शोध घेणारे श्वान काही अंतरावर जाऊन घुटमळत परत आले.

साई मोटर्सच्या दुकान मालकाला पोलिसानी अधिक विचारणा करत सीसीटीव्हीचे फुटेज घेतले. किती रक्कम चोरी झाली. कुठून रक्कम आणली होती, याबाबत सर्व हकिकत जाणून घेत सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून घेतली. दरम्यान, सोलापूर शहरात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. गणेश आगमन वेळी, पीपीई किट परिधान करत चोरट्यांनी जवळपास 40 लाख रुपयांचे मोबाईल चोरले होते. तर गुरुनानक चौकात झालेल्या चोरीत चोरट्याने जरकीन परिधान केले होते. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरट्याचा चेहरा देखील स्पष्ट दिसत आहे.

Last Updated : Aug 27, 2020, 4:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.