ETV Bharat / jagte-raho

सावधान...बनावट लिंकवरून 'टिकटॉक' डाऊनलोड करु नका, हॅकर्सच्या जाळ्यात अडकाल

अनेकजण बंदी घालण्यात आलेले टिकटॉक अ‌ॅप एपीके(APK.) फाईलच्या आधारे डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. एपीके ही एक अशी फाईल असते तिच्या आधारे तुम्ही एखादे अ‌ॅप डाऊनलोड करू शकता. आता  प्लेस्टोअरवरून टिकटॉक गायब झाल्याने अनेकजण इंटरनेटवर हे अ‌ॅप एपीके लिंकच्या स्वरुपात शोधत आहेत. त्यामुळे हॅकर्स या अ‌ॅपच्या फेक लिंक फसवणुकीसाठी वापरत आहेत. अनेकांच्या मोबाईलमध्ये टिकटॉक डाऊनलोड करण्यासाठी ही एपीके लिंकही पाठवत आहेत. मात्र, यातून तुमची माहिती चोरीला जाण्याची शक्यता जास्त आहे. तसेच तुमची आर्थिक फसवणुकही होऊ शकते.

Tiktok is the new weapon for cyber hackers, dont click on apk file
सावधान....बनावट लिंकवरून 'टिकटॉक' डाऊनलोड करु नका, हॅकर्सच्या जाळ्यात अडकाल
author img

By

Published : Jul 12, 2020, 8:29 AM IST

जयपूर (राजस्थान) - टिकटॉक हे शॉर्ट व्हिडिओ अ‌ॅप भारतात प्रचंड लोकप्रिय होते. मात्र, माहिती सुरक्षेच्या कारणास्तव चिनी बनावटीच्या या अ‌ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉकमधील व्हिडिओमुळे काहींच्या चेहऱ्यावर जरी हसू येत असले तरी बंदी घालण्यात आल्यानंतर सायबर गुन्हेगारांसाठी हे एक नवे शस्त्र सापडले आहे. जे युजर टिकटॉकच्या आहारी गेले आहेत, ते आता बेकायदेशीरपणे काहीही करुन अ‌ॅप डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या हव्यासापोटी सायबर गुन्हेगारांनी गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे.

अनेकजण बंदी घालण्यात आलेले टिकटॉक अ‌ॅप एपीके(APK.) फाईलच्या आधारे डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. एपीके ही एक अशी फाईल असते तिच्या आधारे तुम्ही एखादे अ‌ॅप डाऊनलोड करू शकता. आता प्लेस्टोअरवरून टिकटॉक गायब झाल्याने अनेकजण इंटरनेटवर हे अ‌ॅप एपीके लिंकच्या स्वरुपात शोधत आहेत. त्यामुळे हॅकर्स या अ‌ॅपच्या फेक लिंक फसवणुकीसाठी वापरत आहेत. अनेकांच्या मोबाईलमध्ये टिकटॉक डाऊनलोड करण्यासाठी ही एपीके लिंकही पाठवत आहेत. मात्र, यातून तुमची माहिती चोरीला जाण्याची शक्यता जास्त आहे. तसेच तुमची आर्थिक फसवणुकही होऊ शकते.

एपीके फाईलच्या लिंकवरून भारतात बंदी असलेले टिकटॉक अ‌ॅप तुम्हाला वापरता येईल, असे फेक मेसेज व्हॉट्सअ‌ॅपवरुन व्हायरल होत आहेत. अशा संदेशांना कृपया बळी पडू नका. फेक(बनावट) लिंकवरून कोणतेही अ‌ॅप डाऊनलोड करु नका, यासाठी 'ईटीव्ही भारत' जगजागृतीपर अभियानही राबवत आहे. यामुळे नागरिकांना सत्य काय आहे ते समजेल.

जर तुम्ही या बनावट लिंकवर क्लिक केले तर तुमच्या मोबाईलमधील सर्व फोन नंबर आणि वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांना मिळेल. टिकटॉक डाऊनलोड करण्याच्या हव्यासापोटी तुम्ही मोठ्या सायबर गुन्ह्याचे शिकार होऊ शकता. त्यामुळे अशा कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका.

fake tiktok download
फेक टिकटॉक डाऊनलोड.

फेक लिंकवरून टिकटॉक डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला असता अ‌ॅप तर डाऊनलोड होतच नाही. मात्र, इंटरनेटवर अनेक जाहिरातींची पाने (वेब पेज) उघडतात. या सर्व लिंकवरुन तुमची माहिती चोरी केली जाऊ शकते. टिकटॉकच्या आहारी गेलेल्यांना सायबर गुन्हेगारांकडून लक्ष केले जात आहे. त्यांना संदेशाद्वारे ही एपीके लिंक पाठविण्यात येत आहे.

जागते रहो....टिकटॉक अ‌ॅप डाऊनलोड लिंकवर क्लिक करू नका -

  • सायबर हॅकर्स व्हॉट्सअ‌ॅप, मेल किंवा मोबाईल मेसेजद्वारे टिकटॉक डाऊनलोड करण्याची लिंक पाठवत आहेत.
  • तुम्ही या लिंकवर क्लिक केले तर तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरसचा शिरकाव होतो.
  • तुमच्या मोबाईलमधील सर्व फोन नंबर आणि वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांकडे जाईल.
  • तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलेले पासवर्डही हॅकर्सला समजतील.

सुरक्षेसाठी हे करा -

  • तुमच्या मोबाईलमध्ये येणाऱ्या प्रत्येक लिंकचे (युआरएल) स्पेलिंग चेक करावे.
  • फोनमध्ये एखादा व्हायरस शिरला आहे का? हे सॉफ्टवेअरद्वारे चेक करत चला.

सुरक्षेसाठी हे करू नका -

  • अज्ञात आणि माहिती नसलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
  • व्हॉट्सअ‌ॅप, ईमेल आणि मोबाईल मेसेजवर येणाऱ्या टिकटॉक अ‌ॅप डाऊनलोड लिंकवर क्लिक करू नका.
  • बंदी घालण्यात आलेले कोणतेही अ‌ॅप अवैधरित्या डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करू नका.
    सावधान....बनावट लिंकवरून 'टिकटॉक' डाऊनलोड करु नका, हॅकर्सच्या जाळ्यात अडकाल

तज्ज्ञांचे मत काय ?

अशा फसवणुकींपासून वाचण्यासाठी जनजागृती हा महत्त्वाचा उपाय आहे. जर एखाद्याचा मोबाईल डेटा चोरी केला तर त्याच्या मोबाईलमधील फोन नंबरवरही हॅकर्सला फेक मेसेज पाठवता येतात. अशा कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका. तुमचे मित्र, कुटुंबीय, नातेवाईक सर्वांना या ऑनलाईन धोक्यापासून सतर्क करा, असे सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ विशाल वर्मा म्हणतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.