औरंगाबाद - सातारा परिसरातील द्वारकादासनगरमधील उच्चभ्रू वसाहतीत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी पंटरच्या मदतीने आज सायंकाळी सापळा रचून छापा मारला. यावेळी देहव्यापार करणाऱ्या २ मुली आणि २ दलालांना अटक करण्यात आली.
द्वारकादासनगर मधील २ रो-हाऊस मध्ये २ दलाल मुंबई येथील मुली आणून मागील अनेक महिन्यापासून त्यांच्याकडून देह व्यापार करुन घेत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सातारा आणि पुंडलिकनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पंटरच्या मदतीने सापळा रचून तुषार राजपूत आणि प्रविण कुरकुटे या २ दलालासह देहव्यापार करणाऱ्या २ तरुणींना अटक केली. हे दोन्ही दलाल राज्यातील विविध शहरातून मुलींना औरंगाबादेत आणून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल आडे यांनी दिली.