ETV Bharat / jagte-raho

अहमदनगर जिल्हा रुग्णालय परिसरातील रुग्णवाहिकेमध्ये आढळली दारू

अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना नगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पाण्याच्या टाकीजवळ बेकायदेशीर दारू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तिघा आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

author img

By

Published : Apr 29, 2020, 11:56 PM IST

liquor found in ambulance near ahmednagar civil hospital
अहमदनगर जिल्हा रुग्णालय परिसरातील रुग्णवाहिकेमध्ये आढळली दारू

अहमदनगर - शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात छापा टाकून दारू असणाऱ्या अँब्युलन्स, एक दुचाकी असा २ लाख ७० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तिघांना पकडण्याची धडाकेबाज कारवाई तोफखाना पोलिसांनी केली आहे. अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना नगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पाण्याच्या टाकीजवळ बेकायदेशीर दारू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तिघा आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी नगर शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांना याची माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले. मिटके यांनी तोफखाना पोलिसांच्या पथकासह सिव्हिल परिसरात जाऊन सापळा लावला. या दरम्यान रस्त्याने येणारी सुझुकी अ‌ॅक्सेस मोपेड (एमएच १६, सीजे ४४९६) वरील वीरु प्रकाश गोहेर (रा.सिव्हिल क्वार्टर रुम नं. २७, अहमदनगर), रॉबीन जॉर्ज कोरेरा (रा. सिव्हिल क्वार्टर, रुम नं.७) यांना थांबवून पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या.

पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी या दारूच्या बाटल्या संजय हुंकारे याच्याकडून घेतल्या असून, हा त्याच्या अँब्युलन्समधून आम्हाला दारूचा माल काढून दिला आहे. त्याच्याकडे अजून एक दारू बॉक्स आहे, अशी माहिती दिली. यावेळी तत्काळ पंचासमक्ष सिव्हिल परिसरात जाऊन संजय गंगाराम हुंकारे याला ताब्यात घेतले. त्याच्या अँब्युलन्स (एमएच १४, ईवाय १३६५) ची झडती घेतली, व्हॅनमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. अँब्युलन्स (एमएच १४, ईवाय १३६५), सुझुकी अँक्सेस मोपेड (एमएच १६, सीजे ४४९६) व दारू जप्त करून तिघा आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.