ETV Bharat / jagte-raho

गँगस्टर एजाज लकडावाला टोळी सक्रीय, व्यापाऱ्याला मागितली २ कोटींची खंडणी

गँगस्टर एजाज लकडावालाच्या नावाने कल्याणच्या एका व्यापाऱ्याला २ कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. महारूफ गुलाम मूर्तजा खोटाल (वय-५० वर्ष) यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

police station
पोलीस ठाणे
author img

By

Published : Dec 1, 2019, 11:51 PM IST

ठाणे - गँगस्टर एजाज लकडावालाच्या नावाने कल्याणच्या एका व्यापाऱ्याला २ कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. महारूफ गुलाम मूर्तजा खोटाल (वय-५० वर्ष) यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा - भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण.. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अन् १० रुपयात थाळी, राज्यपालांचे आश्वासन

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याने आपल्या हस्तकांमार्फत खंडणीसाठी धमक्या आणि वसुलीचे सत्र सुरू केल्याचे या प्रकरणामुळे पुढे आले आहे. कल्याणच्या दूध नाका परिसरात महारूफ गुलाम मूर्तजा खोटाल हे दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दररोज त्यांची लाखोंची उलाढाल असते. २२ नोव्हेंबरला दुपारी ते मित्रांसह नाशिकला निघाले होते. या प्रवासादरम्यान त्यांच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. 'मी एजाज लकडावाला बोलतोय...जीव प्यारा असेल तर २ खोके तयार ठेव, नाही तर ठोकून टाकीन,' असे फोनवरून त्यांना धमकावण्यात आले.

हेही वाचा - पुणे: गटारीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाचजण अडकले

त्यांनतर खोटाल यांना वारंवार मॅसेजद्वारे अशा धमक्या दिल्या जात होत्या. अखेर त्यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी व्यापारी खोटाल यांच्या जबानीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - 'ही' आहे भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे...

कोण आहे एजाज लकडावाला?

एकेकाळी एजाज लकडावाला दाऊद गँगचा खास हस्तक म्हणून ओळखला जात होता. मात्र, नंतर तो छोटा राजन गँगमध्ये सामील झाला. १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद आणि राजनच्या टोळी युद्धात लकडावाला मारला गेला, अशी अफवा पसरली होती. मात्र ती अफवाच होती. छोटा राजनपासून वेगळे होऊन काही गुन्हेगारांनी स्वतःची एक गँग तयार केली होती. त्यात एजाज लकडावालाही होता. त्याला 2004 मध्ये कॅनडामधून अटक करण्यात आली होती.

Intro:kit 319Body:कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या नावाने कल्याणच्या व्यापाऱ्याला 2 कोटींची धमकी

ठाणे : गँगस्टर एजाज लकडावाला याच्या नावाने बोलतोय 2 कोटी धमकी दिल्याप्रकरणी कल्याणच्या एका व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केल्याची घटना समोर आली आहे. महारूफ गुलाम मूर्तजा खोटाल (50) असे 2 कोटींची धमकी आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याने आपल्या हस्तकांमार्फत खंडणीसाठी धमक्या आणि वसुलीचे सत्र आरंभिले असल्याचे कल्याणमधील एका प्रकरणातून पुढे आले आहे. कल्याणच्या दूध नाका परिसरात महारूफ गुलाम मूर्तजा खोटाल हे म्हैस अर्थात दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यापारी आहेत. दररोज त्यांची लाखोंची उलाढाल चालते. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी ते मित्रांसह नाशिकला निघाले होते. इतक्यात प्रवासादरम्यान त्यांच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. मी एजाज लकडावाला बोलतोय...जीव प्यारा असेल तर 2 खोके तयार ठेव, नाही तर ठोकून टाकीन, असे फोनवर बोलणाऱ्याने धमकावले.
त्यांनतर व्यापारी महारूफ खोटाल यांना दुसऱ्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी धमकीचा मेसेज आला. 24 नोव्हेंबरला पुन्हा धमकी दिल्यानंतर याच धमकीचा 30 नोव्हेंबर रोजी पुनरावृत्ती झाल्याने व्यापारी महारूफ खोटाल यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तशी तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी व्यापारी खोटाल यांच्या जबानीवरून अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एजाज लकडावाला आहे तरी कोण !
एकेकाळी एजाज लकडावाला दाऊदच्या गँगचा खास हस्तक म्हणून ओळखला जात होता. मात्र नंतर तो छोटा राजनच्या गँगमध्ये सामील झाला. मात्र १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉबस्फोटानंतर दाऊद आणि राजनच्या टोळी युद्धात लकडावाला मारला गेला अशी अफवा पसरली होती, मात्र ती अफवाच होती. छोटा राजनपासून वेगळे होऊन काही गँगस्टरनी स्वतःची एक गँग तयार केली होती त्यात एजाज लकडावाला होता. तसेच त्याला 2004 मध्ये कॅनडामधून अटक करण्यात आली होती.

Conclusion:bajarpeth
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.