ETV Bharat / jagte-raho

कोल्हापुरात फिल्मी स्टाईलने कोट्यवधीचा दरोडा; 24 तासात आरोपी गजाआड

एका खासगी कंपनीची मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी कार अडवून दरोडेखोरांच्या टोळीने फिल्मी स्टाईलने दरोडा टाकला होता. यामध्ये त्यांनी कारमधून तब्बल १ कोटी १८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या दरोड्यातील पाच जणांना कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात गजाआड केले आहे.

पकडलेल्या दरोडेखोरांबरोबर पोलीस अधिकारी
author img

By

Published : Jun 17, 2019, 10:16 PM IST

Updated : Jun 17, 2019, 11:08 PM IST

कोल्हापूर- एका खासगी कंपनीची मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी कार अडवून दरोडेखोरांच्या टोळीने फिल्मी स्टाईलने दरोडा टाकला होता. यामध्ये त्यांनी कारमधून तब्बल १ कोटी १८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या दरोड्यातील पाच जणांना कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात गजाआड केले आहे. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही दरोड्याची घटना घडली होती.

दरोड्याबद्दल माहिती देतांना कोल्हापूर शहराचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख

मुंबईतील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीने १ कोटी १८ लाख किमतीचे सोने आणि रक्कम इर्टिका गाडीने कोल्हापूरला पाठविले होते. कोल्हापूरच्या राजेंद्रनगर परिसरात ही इर्टिका गाडी पैसे आणि सोनं घेऊन येत होती. त्याचवेळी मागावर असलेल्या चोरट्यांनी इर्टिका गाडीसमोर आपली स्विफ्ट गाडी लावून तिला थांबविले. त्यानंतर स्विफ्ट गाडीतून दोघेजण उतरले. त्यांनी दहशत माजवत इर्टिका गाडीवर ताबा घेतला. त्यावेळेस या गाडीत तब्बल ५२ लाखाची रोख रक्कम आणि ६० लाख किमतीचे दोन किलो सोन्याचे दागिने होते. त्याबरोबर या कारमध्ये कंपनीचे तीन कर्मचारी सुद्धा होते. चोरट्यांनी आधी गाडीतील तिघांना जबरदस्ती करुन गाडीतच ठेवले. त्यानंतर चोरट्यांनी तिघाही कर्मचाऱयांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडले. त्यामुळे पुढे काय झाले याची माहिती आधी सोडलेल्या कर्मचाऱ्यांना नव्हती. यामुळे पोलिसांपुढे चोरट्यांचा माग काढण्याचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासातच चोरट्यांना जेरबंद केले आहे.

लक्ष्मण अंकुश पवार, गुंडाप्पा तानाजी नंदिवाले, अविनाश बजरंग मोटे, अक्षय लक्ष्मण मोहिते, इंद्रजित बापू देसाई असे पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या दरोड्यात आणखी मोठी टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 24 तासात केलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी पाच आरोपी आणि काही मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र पोलिसांसमोर आता राहिलेली रक्कम आणि चोरटे पकडण्याचे आव्हान आहे.

मुंबईतील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीने इतकी मोठी रक्कम पाठवतांना सुरक्षेची काळजी का घेतली नाही? ही रक्कम आणि सोने नेमके कशाचे होते? आणि कोल्हापुरात इतकी रक्कम कशासाठी आणली जात होती? असे अनेक प्रश्न पोलिसांच्या कार्वाइनंतर उभा राहिले आहेत.

Intro:अँकर : एका खासगी कंपनीची मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या रक्कम आणि सोन्यावर डल्ला मारला... आणि अवघ्या 24 तासात कोल्हापूर पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला जेरबंद केलं.... चोरीतील सोनं आणि रक्कम ऐकलात तर तुम्ही देखील डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही... कशा पद्धतीनं दरोडा टाकलाय... आणि कसं आरोपींना जेरबंद केलंय पाहूयात या रिपोर्टमधून...Body:व्हिओ 1 – बुरखा घालून उभा केलेले हे चोर साधे-सुधे नाहीत.... तर त्यांनी चक्क 1 कोटी 18 लाख रुपयांवर अगदी फिल्मी स्टाईलनं दरोडा टाकलाय.... लक्ष्मण अंकुश पवार, गुंडाप्पा तानाजी नंदिवाले, अविनाश बजरंग मोटे, अक्षय लक्ष्मण मोहिते, इंद्रजित बापू देसाई असं या दरोडेखोरांचं नाव आहे.. वेळ होती पहाटे पाच वाजताची.... कोल्हापूरच्या राजेंद्रनगर परिसरात हि इर्टिका गाडी पैसे आणि सोनं घेऊन येत होती... त्याच वेळी मागावर असलेले चोरट्यांनी इर्टिका गाडीसमोर स्विफ्ट गाडी लावली.... दोघेजण उतरले आणि दहशत माजवत इर्टिका गाडीवर ताबा घेतला... या गाडीत तब्बल 52 लाखाची रोख रक्कम आणि 60 लाख किमतीचे दोन किलो सोन्याचे दागिने होते... पुढे त्याचं काय झालं ऐका...

बाईट 1 – डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

व्हिओ 2 – चोरट्यांनी गाडीतील तिघांना जबरदस्ती करुन गाडीतच ठेवले होते... तिघांनाही चोरट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सोडलं.... त्यामुळं पुढे काय झालंय याची माहिती आधी सोडलेल्या कर्मचाऱ्यांना नव्हती... त्यामुळं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं होतं....

बाईट 2 – डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

व्हिओ 3 – ही मोठी रक्कम आणि सोनं होतं मुंबईतील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीची... इतकी मोठी रक्कम घेऊन येताना या कंपनीनं सुरक्षेची काळजी का घेतली नाही? ही रक्कम आणि सोनं नेमकं कशाचं होतं? कोल्हापुरात इतकी रक्कम कशासाठी आणली जात होती? असे अनेक प्रश्न उभा राहिलेत...

बाईट 3 – डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

व्हिओ 4 – या दरोड्यात आणखी मोठी टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.... 24 तासात पाच आरोपी आणि काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय... मात्र राहिलेली रक्कम आणि चोरटे पकडने हे पोलिसांसमोर आव्हान आहे...Conclusion:.
Last Updated : Jun 17, 2019, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.