ETV Bharat / jagte-raho

हळद रुसली, नवरी फासावर चढली; लग्नादिवशीच प्रेयसीची प्रियकराबरोबर आत्महत्या

पूजाचा विवाह 31 मे रोजी निश्चित करण्यात आला होता. विरह सहन होणार नसल्याने या दोघांनी गावातील एका शेतातील झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Lover
आत्महत्या केलेले प्रेमीयुगुल
author img

By

Published : Jun 1, 2020, 12:19 AM IST

औरंगाबाद- वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील कोल्ही गावात विवाहाच्या काही तास आधी तरुणीने आपल्या प्रियकरासोबत आत्महत्या केल्याची घटना घडली. सतीश अशोक पवार (23) आणि पूजा रमेश पवार (22) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

पूजाचा विवाह 31 मे रोजी निश्चित करण्यात आला होता. विरह सहन होणार नसल्याने या दोघांनी गावातील एका शेतात झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा आणि सतीश वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील कोल्ही गावात राहत होते. काही वर्षांपासून त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम जडले. मात्र, पूजाच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह निश्चित केला. 31 मे विवाहाची तारीख ठरली. आपली प्रेयसी कायमची निघून जाणार, या भावनेतून प्रेयसीसोबत प्रियकराने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

लग्नाच्या काही तास आधी सतीश आणि पूजा भेटले. आता परत भेट होणार नाही. विवाह करुन पूजा निघून जाईल, त्यामुळे व्यथित झालेल्या या प्रेमीयुगुलाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पूजाच्या अंगावर हळद लागण्याधीच अंगावरच्या पिवळ्या साडीने दोघांनी एकत्र गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी शिऊर पोलिसात प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.