ETV Bharat / jagte-raho

मीरा भाईंदर : नियमांचे उल्लंघन करत फटाके फोडणाऱ्या ६४ व्यक्तींवर गुन्हे दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिवाळी साजरी करताना काही नियम व अटी घातल्या होत्या. मात्र, या नियम व अटींचे उल्लंघन अनेकांकडून करण्यात आले. अशाच नियमांची पायमल्ली करणाऱ्या ६४ जणांविरोधात मीरा भाईंदर, वसई विरारच्या विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

प्रातिनिधीक छााचित्र
प्रातिनिधीक छााचित्र
author img

By

Published : Nov 18, 2020, 4:29 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - नियमांचे उल्लंघन करून फटाके फोडणाऱ्या एकूण ६४ व्यक्तींविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी प्रत्येक सणांवर सावट पाहायला मिळाले. गतवर्षी प्रमाणे दिवाळीत फटाके फोडण्यासाठी वेळेची मर्यादा देण्यात आली होती. मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाने नियमावली तयार केली होती. शहरातील २० मैदानांवर फटाके विकण्यासाठी परवानगी दिली गेली. त्यात रात्री ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. मात्र, अतिउत्साही फटाके फोडणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी समाचार घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करत शहरातील मुख्य रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या ६४ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मीरा भाईंदर वसई- विरार परिमंडळ -१ चे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

कोणत्या पोलीस ठाण्यात किती जणांविरोधात गुन्हे..?

भाईंदर पश्विम पोलीस ठाणे - ३०

नवघर पोलीस ठाणे - ११

मिरा रोड पोलीस ठाणे - १०

काशिमीरा पोलीस ठाणे - ५

नया नगर पोलीस ठाणे -

उत्तन पोलीस ठाणे -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.