पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातील भोसरी परिसरामध्ये काही महिन्यांपूर्वी साथीदारांनी काढलेल्या टॅटूवरून सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना भोसरी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन सोलापूर महामार्गावरुन अटक केली आहे. मयूर हरिदास मडके, असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो एमएम नावाच्या ग्रुपचा मुख्य सूत्रधार होता. खून केलेले आरोपीही याच टोळीतील आहेत.
या प्रकरणी भोसरी पोलिसांनी रोशन हरी सौडतकर, मंगेश शुक्राचार्य मोरे, प्रणेश चंद्रकांत घोरपडे, शुभम बलराम वाणी वैभव तान्हाजी ढोरे यांना अटक केली आहे. आरोपी हे लातूरला पळून जाणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुमित देवकर आणि सुमित रासकर यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी एक पथक तयार करुन आरोपीना सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाका येथून सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मयूर मडके हा एमएम नावाच्या ग्रुपचा मुख्य सूत्रधार होता. दरम्यान, त्याच ग्रुपचे इतर आरोपी हे सदस्य आहेत. मयूर मडके आणि मंगेश मोरे या दोघांच्या नावाने ग्रुप होता. ग्रुपमधील काही साथीदारांनी एमएम नावाचा टॅटू गोंदला होता. मात्र, तो टॅटू कोणाचा यावरुन सदस्यांमध्ये चर्चा झाली. तसेच इतर वादाविषयी चर्चा करण्यासाठी मंगेश ग्रुपमधील इतर साथीदारांसह मयूर मडके याला भेटले. तेव्हा, तिथे झालेल्या भांडणात मयूरचा मंगेश आणि इतर साथीदारांनी कोयत्याने वार करून खून केला आहे. याप्रकरणी आरोपींना अवघ्या काही तासातच जेरबंद करण्यात आले आहे.
ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी सुमित देवकर, सुमित रासकर, गणेश हिंगे, संतोष महाडिक, आशिष गोपी या पथकाने