ETV Bharat / international

Xi Jinping : शी जिनपिंग देश सोडायला घाबरत आहेत? काय आहे सत्य परिस्थिती?

Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात होणाऱ्या जी २० शिखर परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून अस्थिरतेचं वातावरण आहे. त्यातच भारत-चीन सीमेवर सध्या तणावाची स्थिती आहे. त्यामुळे जिनपिंग कुठलाच धोका पत्करायच्या मुडमध्ये नाहीत.

Xi Jinping
शी जिनपिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 10:42 AM IST

नवी दिल्ली : Xi Jinping : नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी २० गटाच्या वार्षिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. जगभरातील महत्वाचे नेते या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीबद्दल अद्यापही साशंकता आहे.

भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती : शी जिनपिंग या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यांच्या सहभागाबद्दल चीनकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. भारत आणि चीनमधील सीमेवरचा तणाव हे या मागचं कारण असू शकतं. सध्या भारत - चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांनी गेल्या काही वर्षातली निच्चांक पातळी गाठलीय. त्यामुळे शी जिनपिंग भारतात होणाऱ्या या परिषदेपासून अंतर राखू शकतात. शी जिनपिंग यांच्या ऐवजी चीनचे पंतप्रधान ली कियांग जी २० परिषदेला हजेरी लावतील. ते नुकतेच जकार्ता येथे झालेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेतही सहभागी झाले होते.

शी जिनपिंगनं चीनमधून बाहेर जाणं कमी केलं : चीनमध्ये २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर नागरिकांवर अत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्या काळात लोकांना घरात अक्षरश: कोंडून ठेवण्यात आलं होतं. यामुळे शी जिनपिंग यांना मायदेशात लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यांची प्रशासनावरची पकड ढिली होतेय की काय, असंही चित्र होतं. तेव्हापासून शी जिनपिंग यांनी चीनबाहेर जाणं अत्यंत कमी केलंय. लॉकडाऊन लागू केल्यानंतर ते जवळपास दोन वर्ष चीनमधून बाहेर पडले नव्हते. २०२१ मध्येही ते चीनच्या कोरोना निर्बंधांच कारण देऊन जी २० शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी इटलीला गेले नव्हते.

हे प्रमुख नेते सहभागी होतील : नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी जी २० शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी सहभागाची पुष्टी केलीय.

जी २० मध्ये या देशांचा समावेश : नरेंद्र मोदी १० सप्टेंबर रोजी ब्राझीलचे राष्ट्रपती लुला यांच्याकडे जी २० अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. जी २० सदस्य देश जागतिक जीडीपीच्या ८५ टक्क्यांहून अधिक जीडीपीचं प्रतिनिधित्व करतात. या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि युरोपीय युनीयनचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. Tharman Shanmugaratnam : आणखी एक भारतीय वंशाचा व्यक्ती बनला 'या' समृद्ध देशाचा राष्ट्रपती
  2. Modi Jinping Meet : सीमेवर तणाव अन् मोदी-जिनपिंग यांच्यात भेट; दोन नेत्यांमध्ये काय झाली चर्चा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.