ETV Bharat / international

Ajay Banga World Bank Chief : जाणून घ्या कोण आहेत जागतिक बॅंकेचे नवे अध्यक्ष अजय बंगा - who is Indian American Ajay Banga

भारतीय वंशाचे अजय बंगा जागतिक बँकेचे नवे प्रमुख असतील. यापूर्वी डेव्हिड मालपास हे या पदावर होते. गेल्या आठवड्यात त्यांनी राजीनामा दिला होता. अजय बंगा हे सध्या जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष आहेत.

Ajay Banga
अजय बंगा
author img

By

Published : Feb 24, 2023, 8:40 AM IST

Updated : Feb 24, 2023, 8:49 AM IST

वॉशिंग्टन : एकीकडे भारताचा शेजारी पाकिस्तान जागतिक बॅंकेकडून कर्ज मिळवण्यासाठी धडपडतो आहे, तर दुसरीकडे एका भारतीय वंशाचा व्यक्तीची जागतिक बॅंकेच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय वंशाचे उद्योगपती अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. बायडन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अजय बंगा यांना जागतिक कंपन्यांमध्ये काम करण्याचा चांगला अनुभव आहे. ते म्हणाले की, अजय जागतिक बँकेचे नेतृत्व करण्यासाठी योग्य आहेत.

सध्या जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष : जो बायडन म्हणाले की, बंगा हे जागतिक बँकेचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ जागतिक कंपन्यांची निर्मिती आणि व्यवस्थापन केले आहे. या कंपन्या विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये रोजगार निर्माण करतात. बायडन म्हणाले की, बंगा यांचा लोकांचे व्यवस्थापन करण्याचा आणि चांगले परिणाम देण्याचा उत्तम ट्रॅक रेकॉर्ड आहे. अजय बंगा हे सध्या जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष आहेत.

2016 मध्ये पद्मश्री मिळाले : अजय बंगा यांना 2016 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी म्हटले आहे की, बंगा हे परिवर्तनवादी अध्यक्ष ठरतील. यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) नेही अजय बंगा यांचे अभिनंदन केले आहे. यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ मुकेश अघी म्हणाले की, अजय यांचा अमेरिका-भारत संबंधांच्या मजबूतीवर आणि संबंध आणखी मजबूत करण्यावर विश्वास आहे. यूएसआयएसपीएफ संस्थापक मंडळ सदस्य म्हणून स्थापन करण्यात बंगा यांचा मोलाचा वाटा आहे. ते गेल्या पाच वर्षांत आमच्या यशातील महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. गेल्या आठवड्यात जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती.

विवेक रामास्वामी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी लढणार : भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी यांनी ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 37 वर्षीय विवेक रामास्वामी हे लहान असताना त्यांचे पालक केरळमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. विवेक रामास्वामी यांनी एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षीय निवडणूक लढवणारे ते दुसरे भारतीय-अमेरिकन आहेत. या आधी भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांनी देखील त्या रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदासाठी लढणार असल्याची घोषणा केली होती.

हेही वाचा : Vivek Ramaswamy : आणखी एक भारतीय वंशाचा नागरिक लढवणार अध्यक्षपदाची निवडणूक, ट्रम्प यांना देणार टक्कर!

Last Updated : Feb 24, 2023, 8:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.