ETV Bharat / international

WHO alert: खोकल्या्च्या औषधामुळे गांबियातील ६६ मुलांचा मृत्यू, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा - indian cough syrup deaths in gambia

जागतिक आरोग्य संघटनेने (world health organization) भारतीय फार्मास्युटिकल कंपनीने उत्पादित केलेल्या चार दूषित औषधांना धोकादायक म्हणून जाहीर केले आहे. (WHO alert for Indian medicine). या औषधांचा संबंध गंभीर मूत्रपिंडाच्या दुखापतींशी आणि त्यामुळे आफ्रिकेतील गांबियात झालेल्या 66 मुलांच्या मृत्यूंशी आहे. (death of childrens in Gambia).

medicine
Medicine
author img

By

Published : Oct 6, 2022, 10:05 AM IST

युनायटेड नेशन्स / जिनेव्हा: जागतिक आरोग्य संघटनेने (world health organization) भारतीय फार्मास्युटिकल कंपनीने उत्पादित केलेल्या चार दूषित औषधांना धोकादायक म्हणून जाहीर केले आहे. (WHO alert for Indian medicine). या औषधांचा संबंध गंभीर मूत्रपिंडाच्या दुखापतींशी आणि त्यामुळे आफ्रिकेतील गांबियात झालेल्या 66 मुलांच्या मृत्यूंशी आहे. (death of childrens in Gambia). डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस ऑधानोम घेब्रेयसस यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले, "भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने उत्पादित केलेली चार औषधे खोकला आणि सर्दी सिरप आहेत. डब्ल्यूएचओ ही भारतातील नियामक प्राधिकरण आणि संबधीत कंपनी यांच्या सोबत मिळून पुढील तपास करत ( who alert indian cough syrup ) आहे. औषधामुळे होत असलेल्या तरुणांचा मृत्यू हा त्यांच्या कुटुंबावर पडणारा मोठा आघात आहे".

निर्मात्यांनी उत्पादनांच्या सुरक्षितता आणि गुणवत्तेबद्दल हमी दिलेली नाही: प्रोमेथाझिन ओरल ( Gambia children cough syrup death) सोल्यूशन, कोफेक्समालिन बेबी कफ सिरप, मेकॉफ बेबी कफ सिरप आणि मग्रिप एन कोल्ड सिरप ही या चार धोकादायक उत्पादनांची नावे आहेत. या उत्पादनांचे निर्माते हरियाणा येथील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही कंपनी आहे. आजपर्यंत या नमूद केलेल्या निर्मात्यांनी या उत्पादनांच्या सुरक्षितता आणि गुणवत्तेबद्दल डब्ल्यूएचओला हमी दिलेली नाही, असे डब्ल्यूएचओचे म्हणने आहे. याबाबतीत डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की, दूषित उत्पादने आतापर्यंत फक्त गांबियामध्ये आढळली आहेत. परंतु शंका आहे की ती इतर देशांमध्येही वितरित केली गेली असतील. डब्ल्यूएचओने सर्व देशांना शिफारस केली आहे की, रूग्णांचे आणखी नुकसान टाळण्यासाठी बाजारातून ही ( Maiden Pharmaceuticals WHO Probe ) उत्पादने शोधून त्यांना नष्ट करण्यात यावे.

औषधांच्या सेवनाने होऊ शकतो मृत्यू: डब्ल्यूएचओच्या सप्टेंबर 2022 मधील वैद्यकीय अवहालात सर्वप्रथम गांबियामध्ये ओळखली गेलेल्या या चार निकृष्ट उत्पादनांचा संदर्भ आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, ही निकृष्ट वैद्यकीय उत्पादने गुणवत्ता मानके पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे ती धोकधायक या श्रेणीत मोडतात. चार उत्पादनांपैकी प्रत्येकाच्या नमुन्यांचे प्रयोगशाळा विश्लेषणातून पुष्टी होते की त्यामध्ये दूषित पदार्थ म्हणून डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोल अस्वीकार्य प्रमाणात आहेत. उत्पादनांशी संबंधित जोखमींची रूपरेषा सांगताना डब्ल्यूएचओने सांगितले की, डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोल हे मानवांसाठी विषारी असतात आणि ते प्राणघातक ठरू शकतात. विषारी परिणामांमध्ये पोटात दुखणे, उलट्या होणे, अतिसार, लघवी करण्यास असमर्थता, डोकेदुखी, बदललेली मानसिक स्थिती आणि तीव्र मूत्रपिंड दुखापत यांचा समावेश असू शकतो, ज्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. संबंधित राष्ट्रीय नियामक प्राधिकरणांद्वारे यांचे विश्लेषण होईपर्यंत या उत्पादनांच्या सर्व बॅच असुरक्षित मानल्या जाव्यात असे या अहवालात म्हटले आहे. विशेषत: लहान मुलांना या औषधामुळे गंभीर दुखापत होऊ शकते किंवा त्यांचा मृत्यू देखील ओढावू शकतो, असेही यात ( gambia syrup news ) म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.