ETV Bharat / international

Vivek Ramaswamy News : ..तर आणखी एक भारतीय वंशाची व्यक्ती होणार अमेरिकेचा उपाध्यक्ष, कसं ते जाणून घ्या - अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक संयुक्त तिकीटावर

अमेरिकेत अध्यक्षपदाची शर्यत आता तीव्र झालीय. भारतीय वंशाचे रिपब्लिकन उमेदवार विवेक रामास्वामी यांनी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आपली मजबूत दावेदारी ठोकलीय. सध्या ते पक्षात ट्रम्पनंतर दुसऱ्या स्थानी आहेत. (US president election)

Vivek Ramaswamy
विवेक रामास्वामी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 8:19 AM IST

Updated : Aug 27, 2023, 8:27 AM IST

वॉशिंग्टन : अमेरिकेत पुढील वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती विवेक रामास्वामी हेदेखील स्पर्धेत उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या डिबेटनंतर सध्या सगळीकडे त्यांच्याच नावाची चर्चा आहे.

  • Excellence over victimhood. Merit over grievance. Self-governance over aristocracy. That’s what it means to be American. If the GOP owns that, we win 2024 in a landslide.
    📍 Newton, Iowa pic.twitter.com/SqzXcXuskC

    — Vivek Ramaswamy (@VivekGRamaswamy) August 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

..तर विवेक रामास्वामी उपाध्यक्ष बनतील : रामास्वामी यांच्यासाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवणं तितकं सोपं नाही. एका सर्वेनुसार, रिपब्लिकन पक्षामध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्यापही अव्वल स्थानी आहेत. त्यामुळे आता रामास्वामी यांनी संकेत दिले आहेत की, २०२४ च्या निवडणुकासाठी पक्षाची उमेदवारी मिळली नाही तर ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संयुक्त तिकीटावर लढण्यास तयार आहेत. याचाच अर्थ असा की, जर ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आले तर विवेक रामास्वामी अमेरिकेचे उपाध्यक्ष होणार आहेत.

  • We don’t have to be a nation in some kind of inevitable national decline. Maybe we’re just a little young, going through our national adolescence, figuring out our path to ascent. 🇺🇸 pic.twitter.com/yi1Tck59WA

    — Vivek Ramaswamy (@VivekGRamaswamy) August 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अध्यक्षीय चर्चेत कडवी झुंज दिली : रामास्वामी यांनी बुधवारी त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेत भाग घेतला. चर्चेत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर ख्रिस क्रिस्टीज, माजी उपाध्यक्ष माइक पेन्स आणि दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हेली यांच्याशी चांगलीच झुंज दिली. चर्चेनंतर आत्मविश्वासाने सामोरे जाणाऱ्या रामास्वामी यांनी पत्रकारांना सांगितले की, शर्यतीत फक्त दोनच उमेदवार उरले आहेत, ते आणि ट्रम्प. यावर पत्रकाराने विचारले की, तुम्हाला ट्रम्पचे उपाध्यक्ष झाल्यास आनंद होईल का? यावर रामास्वामी यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. 'मला आपल्या देशाचे पुनरुज्जीवन करायचे आहे. मी जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये जाईन तेव्हाच या देशाला पुन्हा एकत्र करू शकेन', असं रामास्वामी म्हणाले.

ट्रम्प यांनी अध्यक्ष म्हणून उच्च मानक स्थापित केले आहेत. ते माझे मित्र आहेत. मी त्यांना चांगलं ओळखतो. मला विश्वास आहे की त्यांना राष्ट्रीय एकात्मतेची काळजी आहे - अमेरिकन उद्योगपती विवेक रामास्वामी

ट्रम्प यांनी रामास्वामींची प्रशंसा केली : ३८ वर्षीय रामास्वामींनी ट्रम्प यांच्याशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाकारली नाही. मात्र, यापूर्वी ते केवळ अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याबद्दल बोलत होते. एका माध्यमाच्या अहवालानुसार, २०२४ च्या शर्यतीसाठी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये संयुक्त तिकीट असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक चर्चेत रामास्वामी यांची प्रशंसा केली होती. एका माध्यमाच्या सर्वेक्षणानुसार रामास्वामी गुगलवर सर्वाधिक शोधले गेलेले रिपब्लिकन उमेदवार आहेत. तर भारतीय वंशाच्याच निक्की हेली दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा :

  1. US President Race : भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींची लोकप्रियता वाढली, ट्रम्प यांच्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार ठरले
  2. Donald Trump News: तुरुंगात आत्मसमर्पण केल्यानंतर 20 मिनिटांतच सुटले डोनाल्ड ट्रम्प, दोन वर्षानंतर 'X' वर पोस्ट करून म्हणाले..
  3. Modi Jinping Meet : सीमेवर तणाव अन् मोदी-जिनपिंग यांच्यात भेट; दोन नेत्यांमध्ये काय झाली चर्चा?

Last Updated : Aug 27, 2023, 8:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.