ETV Bharat / international

Lewiston Maine Shootings : गोळीबारानं हादरली महासत्ता! लुईस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार, 16 हून अधिक ठार

Lewiston Maine Shootings : लुईस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्यानं अमेरिका हादरली आहे. पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो जारी केला असून, त्याच्या हातात मोठं शस्त्र आहे. त्याचबरोबर या हल्लेखोराला अटक करण्यासाठी पोलिसांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Lewiston Maine Shootings
Lewiston Maine Shootings
author img

By PTI

Published : Oct 26, 2023, 7:52 AM IST

वॉशिंग्टन Lewiston Maine Shootings : अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील लुईस्टनमध्ये गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. या गोळीबारात आतापर्यंत 16 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. त्याचबरोबर डझनभर लोक जखमी झाले आहेत. तर यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शार्पशूटरनं हा गोळीबार केलाय. ( several people killed in mass firing )

  • लोकांना घरात राहण्याचे आवाहन : अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयानं एक निवेदन जारी करून म्हटलंय की, आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. सर्व व्यवसायांना त्यांची आस्थापना बंद करण्यास सांगत आहोत. सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या विभागाच्या प्रवक्त्यानं लोकांना त्यांचे दरवाजे बंद करून घरात राहण्याचे आवाहन केलंय.

लुईस्टनमध्ये तीन ठिकाणी गोळीबार : लुईस्टनमधील स्पेअरटाइम रिक्रिएशन, स्केमेन्झी बार अँड ग्रिल रेस्टॉरंट आणि वॉलमार्ट वितरण केंद्रासह तीन स्वतंत्र आस्थापनांवर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. वॉशिंग्टनमधील एका अमेरिकन अधिकाऱ्यानं सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या गोळीबाराच्या घटनेची माहिती देण्यात आली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

हल्लेखोराचा फोटो सोशल मीडियावर : अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडतात. याआधीही गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अँडोस्कोगिन काउंटी शेरिफ ऑफिसनं (पोलीस) देखील हल्लेखोराचा फोटो सोशल मीडिया 'X' (पुर्वीचं ट्विटर) वर पोस्ट केलाय. या फोटोमध्ये हल्लेखोर हातात शस्त्र धरलेला दिसतोय. त्याचवेळी गुन्हा केल्यानंतर हा हल्लेखोर फरार झाला आहे. पोलीस या हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

  1. Pune Crime : पिझ्झा द्यायला उशीर झाल्यानं ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण, हवेत गोळीबार करून केली दहशत
  2. Florida Shooting : अमेरिकेत पुन्हा एकदा वंशभेदातून गोळीबार, तीन कृष्णवर्णीयांचा मृत्यू
  3. Sambhajinagar firing : औरंगाबादमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू दुसरा गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.