ETV Bharat / international

Turkey Earthquake Update : तुर्की आणि सीरिया भूकंपातील मृतांची संख्या 41,000 पार, मदतकार्य अजूनही जारी - भूकंप

तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मदत बचाव पथक अजूनही ढिगारा हटवण्यात गुंतले आहेत. तुर्कीत अजूनही भूकंपांची मालिका सुरूच आहे.

Turkey Earthquake
तुर्की भूकंप
author img

By

Published : Feb 17, 2023, 9:31 AM IST

अंकारा : तुर्की आणि सीरियात आलेल्या भीषण भूकंपामुळे शुक्रवारी मृतांची संख्या 41 हजारांहून अधिक झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी आपत्तीग्रस्त देशांसाठी मानवतावादी मदत म्हणून 100 कोटी रुपये देण्याचे आवाहन केले आहे. तुर्कीमध्ये भूकंपाचे किरकोळ धक्के अजूनही जाणवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 12 तासांत 4 वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी घबराट पसरली आहे.

मदत व बचाव कार्य अजूनही चालू : 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरियाच्या काही भागात आलेल्या भूकंपाने हाहाकार माजवला आहे. येथे अजूनही मोठ्या प्रमाणावर मदत-बचाव कार्ये सुरू आहेत. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की बचाव पथक अद्यापही अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. तुर्कीतील हजारो इमारती पत्त्याच्या घरासारख्या कोसळल्या आहेत. या ढिगाऱ्यांच्या तळापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरत आहे.

ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले : तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. डझनभर देशांतील बचाव पथके युद्धपातळीवर मदत व बचाव कार्यात गुंतलेली आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्‍या अनेकांची सुटका अद्यापही सुरू आहे. भूकंप होऊन अकरा दिवस उलटल्या नंतरही लोकांना जिवंत वाचवण्यात यश मिळते आले. एक 17 वर्षीय मुलगी आणि 20 वर्षीय महिलेला मदत बचाव पथकाने जिवंत बाहेर काढले आहे.

जगभरातून मदत : भूकंपग्रस्त भागात भूकंपामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. मूलभूत संसाधने नष्ट झाली असून पाणी, वीज या सुविधा बंद झाल्या आहेत. लोकांन स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले आहे. शेजारील देशांतून बाटलीबंद पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इस्त्रायलने असे वॉटर फिल्टर दिले आहेत जे नाल्यातील पाणी स्वच्छ करून ते पिण्यायोग्य बनवतात. त्याचबरोबर भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री पोहोचवण्यात आली आहे. एनडीआरएफचे अनेक पथक तेथे मदतकार्यात गुंतले आहेत. एनडीआरएफने येथे अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

दशकातील सर्वात विनाशक भूकंप : तुर्कीतील हा भूकंप 1939 पासूनचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. 7.8-रिश्टर स्केलचा हा विनाशकारी भूकंप या दशकातील सर्वात प्राणघातक भूकंप ठरण्याची शक्यता आहे. तुर्की जगातील सर्वात सक्रिय भूकंप झोनपैकी एक आहे. 1999 मध्ये, उत्तर तुर्कीच्या डुझेच्या प्रदेशात उत्तर अनाटोलियन फॉल्ट लाइनवर झालेल्या भूकंपात 17,000 हून अधिक लोक मारले गेले होते.

हेही वाचा : Jammu Earthquake : जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, जीवितसह वित्तहानी नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.