पेशावर(इस्लामाबाद): पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान ( Suicide attack in North Waziristan ) जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान चार सैनिक ठार ( Four Pakistani Soldiers Killed ) झाले. त्याचवेळी अन्य सात जण जखमी झाले. लष्कराच्या मीडिया अफेअर्स शाखेने मंगळवारी ही माहिती दिली.
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स पाकिस्तान (आयएसपीआर) ने सांगितले की, जिल्ह्यातील मीर अली तहसील भागातील पट्टासी चेक पोस्टजवळ एका तीनचाकी रिक्षाने सुरक्षा दलाच्या वाहनाला धडक दिली, त्यानंतर चार सैनिक ठार झाले आणि सात जखमी झाले.
ISPR ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सात जखमींमध्ये तीन सैनिक, दोन नाईक दर्जाचे सैनिक आणि दोन नागरिकांचा समावेश आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आत्मघातकी हल्ल्यातील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. दहशतवादाचा नायनाट करण्याच्या देशाच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. या हल्ल्याचा निषेध करताना ते म्हणाले की, दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत.
हेही वाचा - America Fbi Raid : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर एफबीआयचा छापा