टेक्सास : स्पेसएक्सचे महाकाय नवीन रॉकेट गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता टेक्सासमधील बोका चिका येथील खाजगी स्पेसएक्स स्पेसपोर्ट स्टारबेसवरुन प्रक्षेपित करण्यात आले होते. रॉकेटने त्याचे पहिले उड्डाण केले. परंतु लॉन्च पॅडवरून उठल्यानंतर ते लगेच काही मिनिटांत अपयशी ठरले, अशी बातमी माध्यमांनी दिली. इलॉन मस्कच्या कंपनीचे लक्ष्य मेक्सिकोच्या सीमेजवळ, टेक्सासच्या दक्षिणेकडील टोकापासून जवळजवळ 400-फूट (120-मीटर) स्टारशिप रॉकेट पाठवायचे होते.
रॉकेट प्रक्षेपित करण्याचा स्पेसचा पहिला प्रयत्न : बोका चिका बीच लाँच साइटपासून अनेक मैल दूर असलेल्या दक्षिण पाद्रे बेटावरून प्रेक्षक हे प्रक्षेपण पाहत होते. रॉकेट प्रक्षेपित करण्याचा स्पेसचा पहिला प्रयत्न इंधन भरताना रॉकेटमध्ये अडकलेल्या वाल्वमुळे सोमवारी रद्द करण्यात आला. आदल्या दिवशी, इलॉन मस्कने घोषणा केली की, त्याच्या स्टारशिप रॉकेटच्या दुसऱ्या प्रक्षेपण प्रयत्नासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. सर्व प्रणाली सध्या लॉन्चसाठी सज्ज आहेत, असे मस्क यांनी गुरुवारी एका ट्विटमध्ये लिहिले. अलीकडेच, पहिल्या टप्प्यात दबावाची समस्या निर्माण झाल्यानंतर सोमवारी शेवटच्या क्षणी स्पेसएक्सच्या स्टारशिपचे पहिले प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते.
सर्वात शक्तिशाली रॉकेटचे प्रक्षेपण : अभियंते वेळेत प्रचंड सुपर हेवी बूस्टरसह दबावाच्या समस्येचे निराकरण करू नव्हते, त्यामुळे आतापर्यंत बांधलेल्या सर्वात शक्तिशाली रॉकेटचे नियोजित प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते. अभियंत्यांनी प्रचंड सुपर हेवी बूस्टरच्या सहाय्याने दबावाच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते वेळेत समस्या शोधू शकले नाही. अशी माध्यमांनी बातमी दिली. अनेक वर्षांच्या चाचणीनंतर त्याचे स्टारशिप रॉकेट प्रक्षेपित करण्याचा स्पेसएक्सचा पहिला प्रयत्न होता. स्टारशिप हे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट होते. स्टारशिप कॅप्सूल उड्डाणाच्या तीन मिनिटांत पहिल्या टप्प्यात रॉकेट बूस्टरपासून वेगळे व्हायला हवे होते. पण ते वेगळे झाले नाही, रॉकेटचा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी रॉकेट 33 किमी उंचीवर होते.