वॉशिंग्टन - अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांचे सत्र सुरुच आहे. अमेरिकेच्या मेक्सिकन सिटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला असून त्यात किमान १८ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महापौरांचाही समावेश आहे.
अमेरिकेत माथेफिरूने गोळीबार करण्याच्या घटना सतत घडतात. त्यामुळे बंदुकीच्या परवान्याबाबत नियमन करण्याचे बायडेन प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, २७ सप्टेंबर २०२२ ला एका बंदुकधारीने मध्य रशियातील एका शाळेत गोळीबार russia school shooting केला. ज्यात 17 लोक ठार झाले आणि 24 जण जखमी झाले. हल्लेखोराने स्वत: ला गोळ्या घालून ठार मारले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उदमुर्तिया प्रदेशात मॉस्कोपासून 960 किलोमीटर पूर्वेला असलेल्या इझेव्हस्कमधील शाळा क्रमांक 88 मध्ये गोळीबार झाला होता. russia school shooting deaths injuries
यापूर्वी इराणमध्ये गोळीबार हदीस नजाफी, एक इराणी तरुणी, जी अमिनीच्या मृत्यूविरोधात सुरू असलेल्या ( HADIS NAJAFI PROTEST AGAINST HIJAB ) आंदोलनादरम्यान केस बांधत असतानाच्या व्हिडिओ मुळे व्हायरल झाली. तिची इराणी पोलीस कर्मचा-यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. आता हदीस नजाफी हिच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात लोक तिच्या थडग्यावर फोटो ठेवून रडताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार हदीस हिला सहा गोळ्या लागल्या होत्या. (IRAN POLICE SHOT DEAD BY 6 ROUND FIRING) गोळ्या तिच्या पोटात, मानेवर, हृदयात आणि हाताला लागल्या होत्या.