नॅशव्हिल (अमेरिका) : अमेरिकेतल्या नॅशव्हिलमधील प्राथमिक शाळेत सोमवारी एका माजी विद्यार्थ्याने सहा जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन 9 वर्षांची मुले, शाळेचे उच्च प्रशासक, एक शिक्षक आणि एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. हल्लेखोराकडे दोन असॉल्ट रायफल, एक हँडगनसह इमारतीचा तपशीलवार नकाशा होता. महिला हल्लेखोराने पूर्ण नियोजन करून हा हल्ला केला होता.
हल्लेखोराची ओळख पटली : पोलिसांनी हल्लेखोराबद्दल बराच वेळपर्यंत स्पष्ट माहिती दिली नाही. काही तासांपर्यंत, पोलिसांनी ती 28 वर्षीय महिला असल्याचे सांगितले. अखेरीस त्यांनी त्या व्यक्तीची ओळख ऑड्रे हेल म्हणून केली. त्यानंतर दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस प्रमुखांनी हेल ट्रान्सजेंडर असल्याचे सांगितले. शूटरने इमारतीच्या काचेच्या दरवाज्यांवर गोळीबार करून आत प्रवेश मिळवला, असे पोलिसांनी नंतर ट्विटमध्ये सांगितले. शूटर दोन असॉल्ट स्टाईल रायफल तसेच हँडगनने सज्ज होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही शस्त्रे त्याने नॅशव्हिल परिसरात कायदेशीररित्या प्राप्त केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रध्वज अर्ध्यापर्यंत फडकवण्याचे आदेश : अलिकडच्या वर्षांत अमेरिकेत अशाप्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढी झाली आहे. विशेषत: शाळेत होणाऱ्या गोळीबाराच्या घटना ह्या वाढल्या आहेत. नुकत्याच झालेल्या काही घटनांमध्ये टेक्सासमधील हत्याकांड, व्हर्जिनियामध्ये शिक्षकाला विद्यार्थ्याने गोळी मारणे तसेच गेल्या आठवड्यात डेन्व्हरमध्ये झालेल्या गोळीबारात दोन प्रशासक जखमी होणे, या घटनांचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी नॅशव्हिलमधील हिंसेला बळी पडलेल्यांसाठी आदराचे प्रतीक म्हणून 31 मार्चपर्यंत सर्व फेडरल इमारती आणि मैदानांवर अमेरिकेचा ध्वज अर्ध्यापर्यंत फडकवण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकेत अशा घटनांमध्ये वाढ : ज्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ही घटना घडली ते स्कूल नॅशव्हिल डाउनटाउनच्या अगदी दक्षिणेला समृद्ध ग्रीन हिल्स परिसरात स्थित आहे. अत्यंत निसर्गरम्य असलेले हे ठिकाण प्रसिद्ध ब्लूबर्ड कॅफेचे घर आहे. हे ठिकाण विशेषत: संगीतकार आणि गीतकारांना आवडते.या शाळेमध्ये प्रीस्कूल ते सहाव्या इयत्तेपर्यंत सुमारे 200 विद्यार्थी आहेत. तसेच सुमारे 50 कर्मचारी सदस्य देखील आहेत. नॅशव्हिलमधील सोमवारच्या हिंसाचाराच्या आधी, 2006 पासून के-12 शाळांमध्ये अशा सात सामूहिक हत्या झाल्या आहेत, ज्यात कमीत कमी चार लोकं मारले गेले आहेत. डेटाबेसमध्ये शाळेतील त्या गोळीबाराचा समावेश नाही ज्यात चार पेक्षा कमी लोक मारले गेले आहेत. या घटना अलिकडच्या वर्षांत खूपच सामान्य झाल्या आहेत.
हेही वाचा : California Gurudwara Shooting : कॅलिफोर्नियातील गुरुद्वारामध्ये गोळीबार, दोघांची प्रकृती चिंताजनक