वॉशिंग्टन : कोरोनाच्या जागतिक संसर्गानंतर अमेरिकेतील हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एका आठवड्यात हिंसाचार आणि गोळीबारात एका सैनिकासह किमान सहा जण ठार तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. शिकागो, वॉशिंग्टन, पेनसिल्व्हेनिया, सेंट लुईस, दक्षिण कॅलिफोर्निया आणि बाल्टिमोर येथे झालेल्या गोळीबारात मोठी वाढ झाली. कोरोना संसर्गानंतर अमेरिकेतील हिंसाचारात मोठी वाढ झाली यात शंका नसल्याचे मत कार्नेगी मेलॉन विद्यापीठातील तज्ज्ञ प्रा डॅनियल नागीन यांनी व्यक्त केले. यापैकी काही प्रकरणे केवळ वाद आहेत, तर किशोरवयीन मुलांमध्ये बंदूक वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आक्रमकता नसलेल्या पोलिसांच्या रणनीतीमुळे गैरकृत्य : कोरोनानंतर जगभरात हिंसाचार वाढल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र हिंसाचार वाढण्याच्या कारणाबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत. अमेरिकेतील किशोरवयीन मुलांमध्ये बंदुकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हिंसाचार वाढल्याचे बोलले जाते. मात्र अमेरिकेतील पोलीस कमी आक्रमक असल्याने त्यांच्या रणनितीमुळे हिंसाचार वाढत असल्याचे तज्ज्ञ स्पष्ट करतात. रविवार संध्याकाळपर्यंत वीकेंडची कोणतीही घटना सामूहिक हत्यांच्या व्याख्येत बसत नसल्याचे डॅनियल नागीन यांनी स्पष्ट केले. प्रत्येक ठिकाणी चारपेक्षा कमी लोक मरण पावल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विलोब्रुक इलिनॉयमध्ये झाला गोळीबार : शिकागोच्या विलोब्रुक इलिनॉयमधील उपनगरीय पार्किंगमध्ये रविवारी पहाटे किमान 23 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात एक जण ठार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या ठिकाणी अनेक नागरिक जूनीटींथ साजरा करण्यासाठी जमले होते. डुपेज काउंटी शेरीफच्या कार्यालयाने शांततापूर्ण मेळाव्याचे आयोजन केले होते, मात्र अचानक नागरिक हिंसक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शिकागोच्या नैऋत्येस सुमारे 20 मैल दूर असलेल्या विलोब्रुक, इलिनॉय येथे अनेक लोकांनी गर्दीवर अनेक गोळ्या झाडल्या. हल्ल्यामागचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याची माहिती शेरीफचे प्रवक्ते रॉबर्ट कॅरोल यांनी दिली. 1865 मध्ये गॅल्व्हेस्टन, टेक्सास येथे गुलाम बनवलेल्या लोकांना त्यांची सुटका झाल्याचे कळले. त्यामुळे मुक्त झाल्याच्या घोषणेच्या दोन वर्षांनंतर 1865 मधील सोमवारच्या फेडरल सुट्टीच्या स्मरणार्थ जूनटीन्थ हा उत्सव साजरा करण्यासाठी जमाव जमला होता. मात्र यावेळी गोळीबार झाल्याची माहिती मार्केशिया एव्हरी या साक्षीदाराने
वॉशिंग्टनमध्ये शूटरने केलेल्या गोळीबारात दोन ठार : वॉशिंग्टन स्टेट कॅम्पग्राउंडवर शनिवारी रात्री संगीत महोत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिक थांबले होते. मात्र या नागरिकांवर एका शूटरने गोळीबार सुरू केल्याने दोन नागरिक ठार झाले. या घटनेत आणखी दोन जण जखमी झाले आहेत. यावेळी झालेल्या झटापटीत संशयिताला गोळ्या घालण्यात आल्या. रविवारी पहाटेपर्यंत हा सण सुरू होता, असे ग्रँट काउंटी शेरीफ कार्यालयाचे प्रवक्ते काइल फोरमन यांनी सांगितले. त्यानंतर आयोजकांनी रविवारची मैफल रद्द झाल्याचे ट्विट केले.
सेंट्रल पेनसिल्व्हेनियात बॅरेकवर हल्ला : शनिवारी मध्य पेनसिल्व्हेनियामध्ये एका बंदुकधारी माथेफिरुने राज्य पोलिसांच्या बॅरेकवर हल्ला केल्याने एक सैनिक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास संशयिताने आपला ट्रक लुईस्टाउन बॅरेकच्या पार्किंगमध्ये नेला आणि पळून जाण्यापूर्वी गस्ती कारवर मोठ्या-कॅलिबर रायफलने गोळीबार केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. लेफ्टनंट जेम्स वॅगनर हे संशयिताचा सामना केल्यानंतर गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यानंतर जवानांनी माथेफिरू जॅक रौग्यू ज्युनियर या माथेफिरुला ठार मारण्यात आल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल जॉर्ज बिवेन्स या अधिकाऱ्यांनी दिली.
सेंट लुईस रविवारी पहाटे गोळीबार : शहरातील सेंट लुईस कार्यालयाच्या इमारतीत रविवारी पहाटे झालेल्या गोळीबारात एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या गोळीबारात इतर नऊ किशोरवयीन मुले जखमी झाल्याची माहिती शहराचे पोलीस आयुक्त रॉबर्ट ट्रेसी यांनी दिली. यावेळी गोळीबारात मकाओ मूर या 17 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. हँडगन असलेला एक अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. रविवारी पहाटे 1 च्या सुमारास गोळीबार झाला तेव्हा किशोरवयीन मुले कार्यालयात पार्टी करत होते.
दक्षिण कॅलिफोर्नियातील गोळीबारात आठ जण जखमी : दक्षिण कॅलिफोर्नियातील एका घरातील पूल पार्टीत झालेल्या गोळीबारात आठ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. लॉस एंजेलिसच्या दक्षिणेला कॅलिफोर्नियाच्या कार्सनमध्ये मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. या घटनेनंतर काही वेळातच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. या गोळीबाराच्या घटनमेतील पीडितांचे वय 16 ते 24 वयोगटातील आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बाल्टिमोर गोळीबारात सहा जण जखमी : बाल्टिमोरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात सहा जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी रात्री 9 वाजण्याच्या आधी शहराच्या उत्तरेला गोळ्यांचा आवाज ऐकला. असंख्य बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी असलेले तीन पुरुष घटनास्थळी आढळून आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी परिसरातील रुग्णालयात दाखल केले. बाल्टिमोर पोलिस विभागाचे प्रवक्ते लिंडसे एल्ड्रिज यांनी जखमींचे वय 17 ते 26 वयोगटातील असल्याची माहिती दिल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे.