ETV Bharat / international

Rahul Gandhi On BJP : हिंदू धर्माशी भाजपाचा काहीही संबंध नाही, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल - Rahul Gandhi attack BJP

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पॅरिस दौऱ्यात पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला. भाजपाला हिंदू धर्माशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना कोणत्याही किंमतीत सत्ता मिळवायची आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi On BJP
Rahul Gandhi On BJP
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 9:06 PM IST

लंडन : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पॅरिसमधील विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधताना भारतीय जनता पक्षावर (भाजपा) जोरदार निशाणा साधला. सत्ताधारी पक्षाला कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवायची आहे. त्यांना हिंदू धर्मांशी काहीही देणं-घेणं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. पॅरिसच्या सायन्स पो युनिव्हर्सिटीमध्ये शनिवारी राहुल गांधी बोलत होते. फ्रान्सच्या अग्रगण्य सामाजिक विज्ञान संस्थेत राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा', भारताची लोकशाही संरचना वाचवण्याचा लढा, बदलती जागतिक व्यवस्थेसह, इतर प्रमुख गोष्टींवर चर्चा केली.

'मी गीता वाचली' : ‘इंडिया म्हणजेच भारत’ अशी व्याख्या आपल्या संविधानात करण्यात आली आहे. ही राज्ये एकत्र करून भारत तयार करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे या राज्यांमध्ये सर्व लोकांचा समावेश आहे. त्यांचा आवाज ऐकला जातो. कोणाचाही आवाज दाबला जात नाही. मी गीता, उपनिषदे इतर अनेक हिंदू पुस्तके वाचली आहेत, पण भारतीय जनता पक्ष (भाजपा) जे काही करत आहे, त्याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. नावे बदलणारे लोक इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत,' अशी टीका राहुल गांधींनी यावेळी केली.

'दुबळ्यांचा गैरवापर थांबला पाहिजे' : "भाजपा आरएसएसचे लोक कनिष्ठ जाती, ओबीसी, आदिवासी जाती, अल्पसंख्याक समुदायांची अभिव्यक्ती दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर देशात अत्याचार केले जात आहेत. मला हा भारत नको आहे. हा प्रकार राजकीय आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेली कल्पनाशक्ती आजच्या भारतात नाही,' अशी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली.

हिंदू राष्ट्रवाद चुकीचा शब्द : विरोधी पक्ष भारताच्या लढण्यासाठी कटिबद्ध असून, सध्याच्या अशांततेतून देश निर्विघ्नपणे बाहेर येईल असं राहुल गांधी म्हणाले. संभाषणादरम्यान, देशात 'हिंदू राष्ट्रवाद' वाढण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर गांधी म्हणाले, 'मी गीता, अनेक उपनिषदे वाचली आहेत, मी अनेक हिंदू (धर्माशी संबंधित) पुस्तके वाचली आहेत; भाजपा जे काही करतो त्यात हिंदू धर्मासारखं काहीच नाही नुसल्याचं त्यांनी म्हटलंय. कमकुवत लोकांना घाबरवा असं 'मी हिंदू धर्माशी संबंधित कोणत्याही पुस्तकात वाचले नाही. हिंदू राष्ट्रवाद, हा चुकीचा शब्द आहे. ते हिंदू राष्ट्रवादी नाहीत. त्याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. त्यांना कोणत्याही किंमतीत सत्ता मिळवायची आहे. सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करतील असा टोला त्यांनी भाजपाला लगावलाय.

हेही वाचा -

  1. Deluge dampens G20 summit : कोट्यवधी खर्चूनही भारत मंडपमात तुंबलं पाणी, काॅंग्रेसची मोदी सरकारवर खोचक टीका
  2. G20 session on One Future : पंतप्रधान मोदींकडून जी २० परिषद संपल्याची घोषणा, पुढील अध्यक्षपद 'या' देशाला मिळणार
  3. G२० Summit : जी20 परिषदेतील दिग्गजांनी राजघाटवर महात्मा गांधींना वाहिली आदरांजली; महाराष्ट्रातील बापू कुटीची प्रतिमा दिली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.