ETV Bharat / international

PM Trudeau Allegation On India : भारताबाबत काही आठवड्यांपूर्वीच केले होते आरोप, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंचा खुलासा - हरदीप सिंह निज्जर

PM Trudeau Allegation On India : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन भारतावर आरोप केले आहेत. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी काही आठवड्यापूर्वीच या आरोपाबाबतची माहिती भारताला दिली होती, असा खुलासा केला आहे.

PM Trudeau Allegation On India
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 11:11 AM IST

ओटावा PM Trudeau Allegation On India : कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचा खून करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हरदीप सिंह निज्जरच्या खुनानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर आरोप केले होते. त्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंधावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. आता पुन्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर आरोप केले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या ( Khalistani Terrorist ) हत्येबाबतचे आरोप अनेक आठवड्या अगोदरच भारताकडं करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा वाद रंगणार असल्याचं दिसत आहे.

  • #WATCH | On the India-Canada row, Canadian PM Justin Trudeau says, "In regards to India, Canada has shared the credible allegations with India. We did that many weeks ago. We are there to work constructively with India and we hope that they engage with us so that we can get to… pic.twitter.com/lpgAwKfSdN

    — ANI (@ANI) September 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले पंतप्रधान जस्टीन ट्रूडो : कुख्यात खलिस्तानवादी हरदीप सिंह निज्जर याची हत्या घडल्यानंतर जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप केला होता. जस्टिन ट्रूडो यांच्या या आरोपानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडीयन नागरिकांनी जम्मू काश्मीरचा प्रवास टाळावा असं आवाहन त्यांनी केलं होतं. शुक्रवारीही जस्टिन ट्रूडो यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना भारताबाबत केलेल्या आरोपाबाबत माध्यमांनी विचारलं असता, त्यांनी यावर पुन्हा भाष्य केलं. भारताला काही आठवड्यापूर्वीच याबाबतचे आरोप करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिली. भारताकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

खलिस्तानी दहशतवाद्यांची कॅनडात हत्या : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी संसदेत हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येप्रकरणी भारतावर गंभीर आरोप केले होते. खलिस्तानवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारतातील एजंटचा हात असल्याचा आरोप जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. भारताला अनेक आठवड्या अगोदर याबाबतची माहिती आम्ही दिल्याचं जस्टिन ट्रूडो यांनी यावेळी सांगितलं.

भारतानं फेटाळले आरोप : खलिस्तानवादी हरदीप सिंह निज्जर हा कॅनडात राहून भारतात दहशत पसरवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र त्याची कॅनडात हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली. मात्र त्यानंतर भारतानं कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. कॅनडानं केलेले आरोप निराधार असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. Threats To Hindus In Canda : कॅनडात हिंदूंना धमक्या; द्वेशाला कॅनडात स्थान नाही, कॅनडा सरकारची स्पष्टोक्ती
  2. Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.