वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात गुरुवारी त्यांचे व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा तिरंगा आणि अमेरिकेचा तारे असलेला राष्ट्रध्वज सोबत उंचच उंच फडकत राहो, अशी माझ्यासह भारतीयांची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या संबोधनातून अमेरिका आणि भारत या दोन देशात मैत्रिचा नवा अध्याय सुरू करण्याचा आशावाद दिसून आला.
व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. त्यानंतर व्हाईट हाऊसमधील राज्य डिनरला उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडन व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत. या बैठका ओव्हल ऑफिसमध्ये होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या कार्यक्रमानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत देखील सहभागी होणार आहेत. संरक्षण, अंतराळ, स्वच्छ ऊर्जा आणि गंभीर तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये वाढत्या भारत-अमेरिका संबंधांना अधिक चालना देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी झालेल्या उच्चस्तरीय चर्चेचा उद्देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- कोविडनंतरच्या युगात, जागतिक व्यवस्था नवीन आकार घेत आहे. या काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री संपूर्ण जगाची ताकद वाढवण्यात महत्त्वाची ठरेल. भारत आणि अमेरिका एकत्र काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत.
- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि मी आता थोड्याच वेळात द्विपक्षीय चर्चा करू. प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी विचारविमर्श होईल. आमची चर्चा सकारात्मक होईल, याची मला खात्री आहे.
- भारतीय वंशाचे नागरिक त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने अमेरिकेत भारताची शान वाढवत आहेत. तुम्हीच आमच्या नात्याची खरी ताकद आहात. त्यांना हा सन्मान दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि डॉ. जिल बायडन यांचे आभार मानतो.
- पंतप्रधान झाल्यानंतर मी व्हाईट हाऊसला अनेकदा भेट दिली आहे. इतक्या मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन समुदायासाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- आम्ही दोन्ही राष्ट्रांना आमच्या विविधतेचा अभिमान आहे, आम्ही दोघेही सर्वांचे हित आणि सर्वांचे कल्याण या मूलभूत तत्त्वावर विश्वास ठेवतो.
- मला दुसऱ्यांदा यूएस काँग्रेसला संबोधित करण्याची संधी मिळाली. या सन्मानाबद्दल मी मनापासून आभारी आहे.
- मी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या मैत्रीबद्दल धन्यवाद, अध्यक्ष बायडन.
हेही वाचा -
- Modi Meets Biden : पंतप्रधान मोदी-राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात फेस टू फेस चर्चा; धोरणात्मक संबंधांना अधिक गती देणार
- PM Modi in US : भारत, अमेरिका जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी काम करतील : पंतप्रधान मोदी
- PM USA State Dinner Menu: पंतप्रधानांसाठी बायडेन सरकारने तयार केला खास मेन्यू, जाणून घ्या सविस्तर