नवी दिल्ली - इजिप्त सरकारच्या म्हणण्यानुसार, 11व्या शतकातील या मशिदीच्या दुरुस्तीचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू होते. ज्यामध्ये दाऊदी बोहरा समाजाचा मोठा वाटा आहे. सरकारचे म्हणणे आहे की या दुरुस्तीचा उद्देश इजिप्तमध्ये असलेल्या इस्लामिक ठिकाणांच्या पर्यटनाला चालना देणे आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या समुदायाला देशभक्त आणि शांततेचे समर्थक म्हटले आहे. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व आहे.
समाजाबद्दल माहिती - दाऊदी बोहरा समुदाय इस्लामच्या फातिमीद इस्लामिक तय्याबी स्कूलचे पालन करतो. त्याचा समृद्ध वारसा इजिप्तमध्ये जन्माला आला, त्यानंतर येमेनमार्गे तो 11व्या शतकात भारतात स्थायिक झाला. 1539 नंतर भारतात दाऊदी बोहरा समुदायाची संख्या वाढू लागली. त्यानंतर त्यांनी आपल्या पंथाची जागा येमेनमधून गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर येथे हलवली. आजही या परिसरात त्यांचे वडिलोपार्जित वाडे आहेत. या समाजातील पुरुष पांढरे कपडे आणि सोनेरी टोप्या घालतात, तर महिला रंगीबेरंगी बुरखे घालण्यासाठी ओळखल्या जातात.
समाजाचा इतिहास - दाऊदी बोहरा समाजात शिया आणि सुन्नी अशा दोन्ही धर्माचे लोक आहेत. शिया समुदाय मुख्यतः व्यवसाय करतो, तर सुन्नी बोहरा समुदाय प्रामुख्याने शेती करतो. संपूर्ण जगात दाऊदी बोहरा समुदायाची संख्या 10 लाखांच्या जवळपास आहे, त्यापैकी निम्मे म्हणजे 5 लाख नागरिक भारतात राहतात. बोहरा हा शब्द गुजराती भाषेतून आलेला वोरू ज्याचा अर्थ व्यापार असा होतो. गुजरात व्यतिरिक्त, हा समाज भारतातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात देखील आहे, परंतु त्यांची सर्वात जास्त संख्या गुजरातमधील सुरतमध्ये आहे.
मोदींचा समाजाशी जुना संबंध - पंतप्रधान होण्यापूर्वीच नरेंद्र मोदी यांचे दाऊदी बोहरा समाजाशी विशेष संबंध होते. 2011 मध्ये, मुख्यमंत्री म्हणून, त्यांनी समाजाचे धार्मिक प्रमुख सय्यदना बुरहानुद्दीन यांच्या 100 व्या वाढदिवसाच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. नंतर, 2014 मध्ये जेव्हा त्यांच्या धार्मिक नेत्याचे निधन झाले तेव्हा मोदी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा आणि उत्तराधिकारी सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर 2015 मध्ये पंतप्रधान असतानाही त्यांनी सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांची भेट घेतली होती.
समाजाने महात्मा गांधींचे केले होते स्वागत - यानंतर 2016 मध्ये मोदींनी मुंबईतील सैफी अकादमीच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनही केले. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात या समाजाला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतो, असे सांगितले होते. दाऊदी बोहरा धार्मिक नेत्यांच्या चार पिढ्यांशी असलेला त्यांचा संबंधही त्यांनी आठवला. खुद्द मोदींच्या म्हणण्यानुसार या समाजाने समाजातील कुपोषणाशी लढा देण्यासाठी आणि पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी खूप काम केले आहे. महात्मा गांधी दांडीयात्रेवरून परतले तेव्हाही या समाजाने त्यांचे स्वागत केले.
समाजाच्या शिष्टमंडळाची भेट - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2018 मध्ये बांगलादेशात दौऱ्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी दाऊदी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाचीही भेट घेतली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदूरमधील सैफी मस्जिद येथे दाऊदी बोहरा समुदायाने इमाम हुसैन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या आश्र मुबारकाला संबोधित केले होते. या कार्यक्रमाला समाजातील एक लाखाहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
समाजाचा मोदींना पाठिंबा - हा समाज मोदींचा समर्थक राहिला आहे. दाऊदी बोहरा समुदाय नेहमीच पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभा राहिला आहे. 2014 नंतर जेव्हाही पंतप्रधान मोदी परदेशात कार्यक्रम करतात तेव्हा या समाजाचे लोक मोठ्या संख्येने तेथे पोहोचतात. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि सिडनी येथील ऑलिम्पिक पार्क अरेना येथे आयोजित कार्यक्रमांमध्येही या समाजातील नागरिक मोदींना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
हेही वाचा -
- Nita Ambani Saree : मोदींच्या अमेरिका दौऱ्यात निता अंबानींच्या साडीची चर्चा; पाहा फोटो
- State dinner at White House : स्टेट डिनरच्या मैफीलीत पंतप्रधान मोदींनी केला विनोद, पहा व्हिडिओ
- India to Sign Artemis Accords : इस्त्रो नासा 2024 मध्ये लाँच करणार संयुक्त अंतराळ मोहीम, भारत आर्टेमिस अॅकॉर्डमध्ये होणार सामील