ETV Bharat / international

PM Modi USA Visit : व्हाईट् हाऊसमध्ये जो बायडेन अन् फस्ट लेडीने केले पंतप्रधान मोदींचे स्वागत - पंतप्रधान मोदी जो बिडेन यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जिल बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे व्हाईट व्हाऊसमध्ये उत्साहात स्वागत केले.

जो बायडेन अन् फस्ट लेडी जिल बायडेनकडून मोदींचे स्वागत

author img

By

Published : Jun 22, 2023, 8:05 AM IST

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष जो बायडेन आणि फस्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांचे मोठ्या उत्साहाने व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. मोदीचे स्वागतासाठी प्रवेशद्वाराजवळ जो बायडेन आणि जिल बायडेन उभे असल्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी आपल्या कारमधून बाहेर आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी हसतमुखाने मोदींचे स्वागत केले.

विकासाचे ड्रायव्हिंग इंजिन : व्हाईट हाऊसच्या भेटीपूर्वी, पंतप्रधान मोदींनी अप्लाइड मटेरियल्सचे अध्यक्ष आणि सीईओ गॅरी ई डिकरसन, मायक्रोन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष-सीईओ संजय मेहरोत्रा ​​आणि जनरल इलेक्टिकचे अध्यक्ष आणि सीईओ एच लॉरेन्स कल्प जूनियर आणि जनरल इलेक्ट्रीक एरोस्पेसचे सीईओ यांची भेट घेतली. दरम्यान बुधवारी वॉशिंग्टन डीसी येथे आलेले पंतप्रधान मोदी यांनी ‘स्किलिंग फॉर फ्युचर’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, भारत आणि युनायटेड स्टेट्सची भागीदारी शाश्वत आणि सर्वसमावेशक जागतिक विकासामागील ड्रायव्हिंग इंजिन म्हणून काम करेल.

  • As the official gift, US President Joe Biden and First Lady Jill Biden will present PM Modi with a handmade, antique American book galley from the early 20th Century. President Biden will also gift PM Modi a vintage American camera, accompanied by an archival facsimile print of… pic.twitter.com/OeYWYpXUQp

    — ANI (@ANI) June 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रगतीच्या वाढीचा वेग कायम राखण्यासाठी भारत आणि अमेरिकेला प्रतिभेची पाईपलाईन आवश्यक आहे. एका बाजुला अमेरिकेकडे टॉप क्लास शैक्षणिक संस्था आणि उच्च तंत्रज्ञान आहे. तर दुसरीकडे भारत असून भारताकडे सर्वात मोठी युवकांची ताकद आहे. म्हणूनच मला विश्वास आहे की भारत-अमेरिका भागीदारी शाश्वत आणि सर्वसमावेशक जागतिक विकासाचे इंजिन सिद्ध होईल. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

शैक्षिणक क्षेत्रातील कामगिरी : स्किलिंग फॉर फ्युचर या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी भारतातील शैक्षणिक क्षेत्राची माहिती दिली. भारत सरकारने विद्यार्थ्यांच्या उज्ज्व भविष्यासाठी काय केले आहे, त्यावर पंतप्रधान मोदींनी यादरम्यान एक प्रकाशझोत टाकला. नवीन शैक्षणिक धोरणांची अमंलबजावणी आणि एकात्मिक शिक्षण आणि कौशल्य यासारख्या गोष्टी करण्यात आल्याचे मोदी म्हणाले. विद्यार्थांसाठी नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. एकात्मिक शिक्षण आणि कौशल्ये आणली आहेत. भारताने स्किल इंडिया अंतर्गत, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, ड्रोन आणि इतर क्षेत्रात 15 अब्जाहून अधिक लोकांना कुशल केले आहे. पुढे बोलताना मोदींनी अमेरिकन विद्यार्थ्यांना भारतात येण्याचे आवाहन केले. युनायटेड स्टेट्सचे शेकडो शिक्षक आधीच भारतात आहेत. ते तंत्रज्ञान भागीदारीत भाग घेत असल्याचे मोदी म्हणाले.

भारत-अमेरिका शिक्षक विनिमय कार्यक्रमाची कल्पना मांडताना पंतप्रधान मोदी म्हणाले,

"आपण म्हणजेच भारत-अमेरिका शिक्षक विनिमय कार्यक्रम सुरू करण्याचा विचार करू शकतो. जगभरातील शास्त्रज्ञ आणि उद्योजकांची भारतीय संस्थांशी संलग्नता वाढवण्यासाठी शैक्षणिक नेटवर्कचा ग्लोबल इनिशिएटिव्ह - 2015 मध्ये आम्ही GIAN सुरू केले. या अंतर्गत यूएस मधून 750 फॅकल्टी मेंबर भारतात आले आहेत." - पंतप्रधान मोदी

भोजनाचा कार्यक्रम : दरम्यान, पंतप्रधान मोदी गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या स्टेट डिनरला उपस्थित राहणार आहेत. या डिनरमध्ये मोदींसाठी शाकाहारी मेनू ठेवण्यात आले आहेत. त्याच दिवशी पंतप्रधान अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. तर 23 जून रोजी, पंतप्रधानांना संयुक्तपणे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्या स्नेहभोजनाचे आयोजन केले जाईल.

हेही वाचा -

  1. Narendra Modi Yoga : नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात केला योग, वॉशिंग्टन डीसीला रवाना
  2. अमेरिकेतही विक्रम! संयुक्त राष्ट्र मुख्यालयातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वातील योग कार्यक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.