ETV Bharat / international

Israel Palestine Conflict Update : इस्रायलचा हमासविरुद्धचा लढा दुसऱ्या टप्प्यात, इस्त्रायलच्या पंतप्रधानांची घोषणा - gaza war has entered a new stage

Israel Palestine Conflict Update : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलच्या नागरिकांना संबोधित केलं. हमासविरोधातील लढा दुसऱ्या टप्प्यात असल्याचं सांगून त्यांनी आणखी आक्रमक होण्याचं संकेत दिलेत. दुसरीकडं गाझातील लोकांनी इस्त्रायली बॉम्बफेकीचं वर्णन युद्धातील सर्वात भीषण बॉम्बहल्ला असं केलंय. तसंच बहुतांश संपर्क यंत्रणा ठप्प झाली आहे.

Israel Palestine Conflict Update
Israel Palestine Conflict Update
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 8:56 AM IST

जेरुसलेम Israel Palestine Conflict Update : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी रात्री हमाससोबतच्या युद्धादरम्यान राष्ट्राला संबोधित केलंय. संबोधित करताना ते म्हणाले की, सैन्यानं गाझामध्ये भूदल पाठवून हमासविरुद्ध युद्धाचा दुसरा टप्पा सुरू केलाय. तसंच जमीन, हवाई आणि समुद्रातून हल्ले वाढवले ​​आहेत. या युद्धाला इस्रायलच्या अस्तित्वाची लढाई असं वर्णन करून, जमिनीवर आक्रमण करण्यापूर्वी हा हल्ला तीव्र होईल, असा त्यांनी इशारा दिला.

काय म्हणाले नेतन्याहू : इसरायलचे पंतप्रधान म्हणाले, असे काही क्षण येतात जेव्हा एखाद्या राष्ट्राला दोन शक्यतांचा सामना करावा लागतो, करा किंवा मरा. आता आपण त्या परीक्षेला सामोरे जात आहोत. हे कसं संपेल यात मला शंका नाही. आम्हीच विजेते ठरणार आहोत.

ओलिसांना परत आणण्यासाठी वचनबद्ध : इस्रायल सर्व ओलिसांना परत आणण्यासाठी वचनबद्ध असल्याचं नेतन्याहू म्हणाले. ते म्हणाले की संवेदनशीलता आणि गोपनीयतेमुळं काय केलं जात आहे ते उघड करू शकत नाही. तसंच 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यात 1400 हून अधिक लोक मारले गेल्याची कबुलीही नेतान्याहू यांनी दिली. याची सखोल चौकशी करावी लागेल. प्रत्येकाला प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असं ते म्हणाले.

सर्वात भीषण बॉम्बहल्ला : गाझातील लोकांनी इस्त्रायली बॉम्बफेकीचं वर्णन युद्धातील सर्वात भीषण बॉम्बहल्ला असं केलंय. बहुतांश संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली आहे. गाझातील 23 लाख लोकांचा जगाशी असलेला संपर्क तूटला. गाझाच्या मोकळ्या भागातून रणगाडे संथ गतीनं फिरत असल्याचं चित्र सैन्यानं प्रसिद्ध केलं, त्यातील अनेक रणगाडे सीमेच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. लढाऊ विमानांनी हमासच्या डझनभर बोगदे आणि भूमिगत बंकर्सवर बॉम्बफेक केल्याचं सैन्यानं म्हटलंय.

ओलीसांची सुटकेसाठी इस्रायली सरकारवर दबाव : हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात पकडलेल्या डझनभर ओलीसांची सुटका करण्यासाठी इस्रायली सरकारवर देशांतर्गत दबाव वाढलाय. दहशतवाद्यांनी गाझा इथून जवळच्या इस्रायली शहरांवर हल्ला केला. यात अनेक नागरिक आणि सैनिक मारले गेले. त्यानंतर निराश कुटुंबीयांनी शनिवारी नेतान्याहू यांची भेट घेतली. इस्रायलमध्ये कैदेत असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना परतण्यासाठी दबाव आणला. हमासही सातत्यानं तशी मागणी करत आहे.

हेही वाचा :

  1. Israel Palestine Conflict : 100 लढाऊ विमानांचा गाझावर हल्ला; कारवाई तीव्र करण्याचा इस्रायली सैन्यानं दिला होता इशारा
  2. Death Penalty Indian Navy Personnel In Qatar : कतारमध्ये आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा, सरकारला धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.