ETV Bharat / international

Israel Hamas War : पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, अंगरक्षक ठार

Israel Hamas War : वेस्ट बॅंकमध्ये राहणारे पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले, मात्र त्यांचा अंगरक्षक ठार झालाय.

Israel Hamas War
Israel Hamas War
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 4:57 PM IST

तेल अवीव Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धादरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. अब्बास हे वेस्ट बँकमध्ये राहतात.

  • من يطلق الرصاص على قوى الامن الفلسطيني هو والاحتلال في خندق واحد
    تاجر مخدرات وبؤرة لنشر الجريمة في الجلزون وقبل أشهر قام بخطف وإطلاق نار على قوى الأمن.
    الآن يطلق النار على قوى الأمن واصاب بعضهم حماهم الله pic.twitter.com/Xy6cHRuHc5

    — 🇵🇸🇵🇸منير الجاغوب 🇵🇸🇵🇸 (@MonirAljaghoub) November 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रपतींचा अंगरक्षक ठार झाला : रिपोर्ट्सनुसार, अबू जंदालच्या मुलांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याच्या अवघ्या २४ तास आधी या गटानं इस्रायलविरुद्ध जागतिक युद्ध पुकारण्याचं आवाहन केलं होतं. हल्ल्याच्या एक दिवस आधी अब्बास यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री अँटोनी ब्लिंकन यांची भेट घेतली होती. महमूद अब्बास यांनी गाझावर आपलं नियंत्रण प्रस्थापित करावं, अशी सूचना अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी केली होती. या हल्ल्यात राष्ट्रपतींचा एक अंगरक्षक ठार झाला आहे. हे व्हिडिओमध्ये दिसू शकतं.

पॅलेस्टिनींच्या हक्कांबद्दल बोलण्याचा अधिकार : वेस्ट बॅंकमध्ये राहणारे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास आणि गाझामधील हमास ही संघटना पॅलेस्टिनी लोकांचं प्रतिनिधित्व करतात. याशिवाय, असे काही गट आहेत जे दावा करतात की ते पॅलेस्टिनींचे खरे प्रतिनिधी आहेत. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी केवळ पॅलेस्टिनी प्राधिकरणाला मान्यता दिली आहे. पॅलेस्टिनींच्या हक्कांबद्दल फक्त पॅलेस्टिनी प्राधिकरणच बोलू शकतं, हमास नाही. अनेक देशांनी हमासला दहशतवादी संघटना घोषित केलंय.

महमूब अब्बास पीएलओचे अध्यक्ष : महमूब अब्बास हे पॅलेस्टिनी प्राधिकरण पीएलओचे अध्यक्ष आहेत. वेस्ट बँकवर त्यांचा अधिकार असून, गाझा क्षेत्रावर हमासचं नियंत्रण आहे. पीएलओनं २००६ पासून गाझावरील नियंत्रण गमावलं. हमास संघटना अतिरेकी विचारसरणीचं प्रतिनिधित्व करते, तर पीएलओ शांततापूर्ण संवादाच्या बाजूनं आहे.

हेही वाचा :

  1. Israel Hamas War : इस्रायलनं हजारो लोक मारले, भारत युद्धबंदीचं आवाहन करेल अशी आशा - पॅलेस्टिनी राजदूत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.