ETV Bharat / international

ज्यूंच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर एलॉन मस्कला उपरती, इस्त्रायलमध्ये जाऊन 'ही' घेतली माहिती - एक्सचे मालक एलन मस्क

Israel Hamas Conflict : हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतरयुद्ध सुरू आहे. सध्या ओलिसांच्या सुटकेसाठी तात्पुरतं युद्ध थांबवण्यात आलं आहे. या उद्योगपती तथा एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली.

Israel Hamas Conflict
घटनास्थळाची पाहणी करताना एलन मस्क
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 10:40 AM IST

तेल अवीव Israel Hamas Conflict : उद्योगपती आणि एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. एलॉन मस्क यांनी इस्रायलवर हमासनं 7 ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यांच्या ठिकाणांनाही भेट दिली होती. इस्रायलचं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे देखील हमासच्या हल्ल्यात नष्ट झालेल्या इस्रायली किबुट्झच्या दौऱ्यात एलन मस्क यांच्यासोबत पाहणी दौऱ्यात सामील झाले. तत्पूर्वी, एलन मस्क यांनी स्थानिक कौन्सिल नेते आणि इस्रायली संरक्षण दलाच्या प्रतिनिधींकडून हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची माहिती घेतली.

हमास हल्ल्यात झालेल्या नुकसानीची पाहणी : एलॉन मस्क यांनी इस्रायलमध्ये गेल्यानंतर तिथं हमासनं केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. हमासनं इस्रायलमध्ये किबुट्झ या परिसरात मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलच्या लाखो नागरिकांना आपली जीव गमवावा लागला होता.

एलन मस्क यांनी घेतली इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांची भेट : एलॉन मस्क यांनी इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांची भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये हमास आणि इस्रायल युद्धांवर चर्चा झाली. मस्क यांनी इस्रायल दौऱ्यात अध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांचीही भेट घेतली. या भेटीत या दोघांनी हमासनं केलेल्या हल्ल्यासह विविध विषयावर चर्चा केली.

  • Prime Minister Benjamin Netanyahu and @ElonMusk held a meeting today, following their tour of Kfar Aza this morning.

    The PM showed Musk sections of the film that was prepared by the IDF Spokesperson and which shows the horrors of the massacre perpetrated by Hamas on October 7th. pic.twitter.com/4h5h4GNFfL

    — Prime Minister of Israel (@IsraeliPM) November 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मस्क यांनी केलं होतं एक्सवर वादग्रस्त ट्विट : मस्क यांनी हमास आणि इस्रायल यांच्या युद्धाच्या दरम्यान इस्रायल भेटीवर गेल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. मस्क यांनी नुकतंच त्यांच्या एक्स खात्यावर ज्यू समूदायांविरोधात वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. ज्यू समूदाय एका विशिष्ट समूदायाविरोधात द्वेशाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे लवकर थांबवण्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर एक्सवरुन अनेक मोठ्या ब्रँड्सनं आपल्या जाहिराती काढून घेतल्या होत्या.

हेही वाचा :

  1. Video Audio Calling Facility On X : एक्स सोशल मीडियावर येणार 'या' नव्या सुुविधा, एलॉन मस्कची घोषणा
  2. Elon Musk Rishi Sunak Discusses AI : ब्रिटीश पीएम सुनक यांच्याशी एआयच्या जोखमीवर मस्कची चर्चा; वाचा काय म्हणाले मस्क?
  3. Elon Musk Pune Friend : पुणे तिथे काय उणे! पुण्यातील तरुणाची थेट इलॉन मस्कशी मैत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.