ETV Bharat / international

Israel Hamas Conflict : युद्धाला विराम देण्याच्या अमेरिकेच्या आवाहनाला इस्रायलनं दाखवली केराची टोपली

Israel Hamas Conflict : पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल-हमास युद्धात मानवतावादी विराम देण्याच्या अमेरिकेच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्यात. इस्रायलनं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांना सांगितलं की, जोपर्यंत हमास ओलिसांना सोडत नाही तोपर्यंत ते पूर्ण ताकदीनं पुढं जात आहेत.

Israel Hamas Conflict
Israel Hamas Conflict
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 12:19 PM IST

जेरुसलेम Israel Hamas Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल-हमास युद्धात मानवतावादी विराम देण्याच्या अमेरिकेच्या आवाहनाला केराची टोपली दाखवलीय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना त्यांनी शुक्रवारी सांगितलं की हमास ओलिस ठेवलेल्यांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण ताकदीनं पुढं जात आहोत. गेल्या महिन्यात युद्ध सुरू झाल्यापासून ब्लिंकन तिसऱ्यांदा इस्त्रायलच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते जॉर्डनमध्ये नेत्यांची भेट घेणार आहेत. इस्रायली सैन्यानं गाझा शहरात शुक्रवारी दहशतवाद्यांच्या सेलवर हल्ले सुरू केले आहेत.

आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू : इस्रायल-हमास युद्धात पॅलेस्टाईनच्या मृतांची संख्या 9227 वर पोहोचली आहे, असं गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय. तर वेस्ट बँकमध्ये हिंसाचार आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये 140 हून अधिक पॅलेस्टाईन नागरिक ठार झाल्याचं त्यांनी सांगितलंय. तर या युद्धात इस्रायलमधील 1400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. त्यापैकी बहुतेक 7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. यातील बहुतांश संख्या मुलांची असून जगभरातून युद्ध थांबवण्याची सतत विनंती करण्यात येत आहे. हमाससोबत मध्यस्थी करणाऱ्या अमेरिका, इजिप्त, इस्रायल आणि कतार यांच्यातील स्पष्ट करारानुसार बुधवारपासून सुमारे 1100 लोकांनी रफाह क्रॉसिंगद्वारे गाझा पट्टी सोडलीय.

युद्धाला मानवतावादी विराम देण्याची मागणी : सिनेटचे अस्थायी अध्यक्ष असलेल्या मरे यांनी गुरुवारी गाझामधील निर्दोष नागरिकांपर्यंत गंभीर मानवतावादी मदत पोहोचण्यासाठी युद्धात मानवतावादी विराम देण्याची मागणी केली. दहशतवादाविरुद्ध स्वतःचा बचाव करण्याच्या इस्रायलच्या अधिकाराचाही पुनरुच्चार केला. इस्रायली हल्ल्यात गाझामधील फ्रेंच इन्स्टिट्यूटला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानं शुक्रवारी फ्रान्सला दिली या हल्ल्यावेळी संस्थेत काम करणारे किंवा कोणताही फ्रेंच नागरिक संस्थेत नव्हता, असंही परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलंय.

गाझा बिल्ट-अप भागात तीव्र लढाई : इस्रायलच्या आयर्न डोम डिफेन्स सिस्टीमची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. या युद्धात खरी गेमचेंजर म्हणजे बाण क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे. यापूर्वी इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी आपण युद्धाच्या तीव्र धुमश्चक्रीत असल्याचं स्पष्ट केलंय. सध्या गाझा शहरातील बिल्ट-अप भागात तीव्र लढाई सुरू आहे.

हेही वाचा :

  1. Israel Palestine Conflict : 100 लढाऊ विमानांचा गाझावर हल्ला; कारवाई तीव्र करण्याचा इस्रायली सैन्यानं दिला होता इशारा
  2. Israel Hamas War Update : इंधनाचा तुटवडा, इस्रायली बॉम्बफेकीमुळं गाझामध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली; इस्रायल हमास युद्धाचे अपडेट वाचा एका क्लिकवर
  3. Israel Hamas War : भारताकडून पॅलेस्टाईनला मदतीचा हात, हवाई दलाचं विमान मदत साहित्य घेऊन रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.