ETV Bharat / international

Vivek Ramaswamy : आणखी एक भारतीय वंशाचा नागरिक लढवणार अध्यक्षपदाची निवडणूक, ट्रम्प यांना देणार टक्कर! - अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक

मूळ भारतीय असलेले उद्योजक विवेक रामास्वामी यांनी ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली या देखील रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत.

Vivek Ramaswamy
विवेक रामास्वामी
author img

By

Published : Feb 22, 2023, 1:06 PM IST

वॉशिंग्टन : अमेरिकेत पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. या निवडणुका भारतासाठी खूप महत्त्वाच्या आहेत कारण भारतीय वंशाचे अमेरिकन लोक देखील जगातील सर्वात शक्तिशाली पदासाठी आपली उमेदवारी सादर करणार आहेत. भारतीय वंशाच्या निक्की हेलीनंतर आता आणखी एका भारतीय तरुणाने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. विवेक रामास्वामी हे आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठे उद्योजक, पुराणमतवादी भाष्यकार आणि लेखक आहेत.

कोण आहेत विवेक रामास्वामी? : 37 वर्षीय विवेक रामास्वामी हे तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे उद्योगपती आहेत. ते लहान असताना त्यांचे पालक केरळमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले. रामास्वामी यांनी 2014 मध्ये रोइव्हंट सायन्सेसची स्थापना केली आणि 2015 आणि 2016 च्या सर्वात मोठ्या बायोटेक IPO चे नेतृत्व केले. विवेकने एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. रिपब्लिकन अध्यक्षीय प्राइमरीमध्ये प्रवेश करणारे ते दुसरे भारतीय-अमेरिकन आहेत. विवेक रामास्वामी या मुलाखतीत म्हणाले, 'आज रात्री मला हे सांगताना अभिमान वाटतो की मी या देशात त्या आदर्शांना पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सामील होत आहे.'

रामास्वामी यांचे परराष्ट्र धोरण : रामास्वामी यांनी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अमेरिकेला चीनसारख्या बाह्य धोक्यांचा सामना करावा लागत आहे. हे आमच्या पुढील सर्वात मोठे परराष्ट्रीय आव्हान आहे. याला आम्हाला उत्तर द्यावे लागणार आहे. यासाठी थोडा त्याग करावा लागेल. यासाठी चीनपासून स्वातंत्र्य आणि संपूर्ण अलिप्ततेची घोषणा आवश्यक आहे, आणि ते सोपे होणार नाही. विवेक रामास्वामी यांनी आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान कंपन्यांची स्थापना केली आहे. 2022 मध्ये त्यांनी स्ट्राइव्ह अ‍ॅसेट मॅनेजमेंट ही नवीन फर्म सुरू केली आहे.

निक्की हेली या देखील रेस मध्ये : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली आणि विवेक रामास्वामी यांनी 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी स्वतःला उमेदवार घोषित केले आहे. सर्वजण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार आहेत. भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांनी प्रचाराला औपचारिकरित्या सुरुवात देखील केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची थेट स्पर्धा होणार आहे.

हेही वाचा : Russia-Ukraine War: 'आम्हाला शांतता हवी होती मात्र, पाश्चात्य देशांनी उचकवलं..', रशियन संसदेत म्हणाले पुतीन..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.