लंडन India Canada Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येवरुन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो ( Canada Prime Minister Justin Trudeau ) यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपाला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कॅनडानं अद्यापही भारताला खलिस्तानी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताच्या सहभागाचे पुरावे दिले नाहीत. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या दाव्याचं समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करावे, असंही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे.
- जस्टिन ट्रूडो यांनी केले होते पुन्हा आरोप : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर पुन्हा हल्लाबोल करत आरोप केले होते. कॅनडाच्या नागरिकाची कॅनडाच्या भूमीवर हत्या करण्यात आली. या हत्येत भारताच्या एजंटचा सहभाग असल्याचं जस्टिन ट्रूडो यांनी स्पष्ट केलं होतं. त्यासह याबाबतचे पुरावे आपल्याकडं असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
-
An interaction @WiltonPark, London with @lionelbarber. https://t.co/f4YssYBNmM
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An interaction @WiltonPark, London with @lionelbarber. https://t.co/f4YssYBNmM
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 15, 2023An interaction @WiltonPark, London with @lionelbarber. https://t.co/f4YssYBNmM
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 15, 2023
-
जस्टिन ट्रूडो यांनी पुरावे द्यावे : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत-कॅनडा वादावर पुन्हा एकदा भारताची रोखठोक भूमिका स्पष्ट केली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिलं. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या सहभागाचा पुरावा कॅनडाच्या सरकारनं सादर करावा, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं.
-
Delighted to meet UK’s Leader of Opposition @Keir_Starmer in the Parliament.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Value the bipartisan commitment in the United Kingdom towards strengthening our relationship.
Our discussion covered bilateral aspects and shared regional and global interests. pic.twitter.com/q4DFJ32uFg
">Delighted to meet UK’s Leader of Opposition @Keir_Starmer in the Parliament.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 15, 2023
Value the bipartisan commitment in the United Kingdom towards strengthening our relationship.
Our discussion covered bilateral aspects and shared regional and global interests. pic.twitter.com/q4DFJ32uFgDelighted to meet UK’s Leader of Opposition @Keir_Starmer in the Parliament.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 15, 2023
Value the bipartisan commitment in the United Kingdom towards strengthening our relationship.
Our discussion covered bilateral aspects and shared regional and global interests. pic.twitter.com/q4DFJ32uFg
पुरावे देण्याविषयी पुन्हा केली विनंती : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पत्रकार लिओनेल बार्बर यांच्याशी संवाद साधला. कॅनडानं भारतावर खलिस्तानी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येवरुन आरोप केले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी वारंवार भारतीय एजंटचा निज्जरच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप केला आहे. मात्र त्या आरोपाला कोहीतरी पुरावा असावा लागतो, असंही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. हरदीपसिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा काही पुरावा कॅनडाकडं आहे का, असा प्रश्न पत्रकार लिओनेल बार्बर यांनी एस जयशंकर यांना विचारला. यावेळी त्यांनी कॅनडाकडं कोणताही पुरावा नसल्याचं सांगितलं.
-
Pleased to participate in the return to India of the stone idols of Yogini Chamunda and Gomukhi.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Appreciate @HCI_London and UK authorities for their efforts in this regard. pic.twitter.com/GnShMfT1NG
">Pleased to participate in the return to India of the stone idols of Yogini Chamunda and Gomukhi.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 15, 2023
Appreciate @HCI_London and UK authorities for their efforts in this regard. pic.twitter.com/GnShMfT1NGPleased to participate in the return to India of the stone idols of Yogini Chamunda and Gomukhi.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 15, 2023
Appreciate @HCI_London and UK authorities for their efforts in this regard. pic.twitter.com/GnShMfT1NG
परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांच्याशी चर्चा : या प्रकरणी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं. "कॅनडाच्या सरकारला त्यांच्याकडं असलेले पुरावे शेअर करण्याची विनंती केली आहे" असं जयशंकर यावेळी म्हणाले. "कॅनडानं पुरावे दिल्यावर भारत निश्चितपणे तपासात सहकार्य करू इच्छितो. मात्र अद्याप कॅनडानं कोणतेही पुरावे दिलेले नाहीत", असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- India Canada Relations Explained : भारतानं कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना परत का पाठविलं? जाणून घ्या सविस्तर
- India Canada Row : 'आमच्या मातीत येऊन केली कॅनडाच्या नागरिकाची हत्या'; निज्जरच्या हत्येवरुन जस्टिन ट्रूडोंचा पुन्हा हल्लाबोल
- India Canada Row : हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण; मी 'फाईव्ह आईज'चा भाग नाही, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुनावलं