ETV Bharat / international

Hawaii Wildfire : हवाई द्विपावरील आगीत आतापर्यंत 89 नागरिकांचा बळी, अमेरिकेच्या इतिहासातील ठरली सगळ्यात मोठी दुर्घटना

author img

By

Published : Aug 13, 2023, 11:53 AM IST

अमेरिकेच्या हवाई द्विपावर भीषण आग लागली आहे. या आगीत बळी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आगीत आतापर्यंत 89 नागरिकांचा बळी गेल्यामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. ही आग अमेरिकेतील आतापर्यंतची सगळ्यात मोठी आग ठरली आहे.

Hawaii Wildfire
अमेरिकेतीलआगीत जळालेला परिसर

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हवाई द्विपावर लागलेल्या आगीत आतापर्यंत 89 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे प्रचंड जीवितहानी होत आहे. हवाई द्विपावर लागलेली ही आग अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी आग ठरली आहे. यापूर्वी अमेरिकेत 2018 मध्ये कॅम्प फायरच्या वेळी लागलेल्या आगीत तब्बल 85 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

प्रशिक्षित श्वान घेत आहेत मृतदेहांचा शोध : अमेरिकेच्या हवाई द्विपावर लागलेल्या प्रचंड आगीत नागरिकांचा बळी गेल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आगीमुळे जो बायडन यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. हवाई द्विपावर झालेल्या जीवितहानीचा आढावा घेण्यात येत आहे. मात्र अद्यापही ही आग अटोक्यात आली नाही. या आगीत नागरिकांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात जळालेले आहेत. प्रशिक्षित श्वानांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे बळींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चार हजारापेक्षा जास्त नागरिक बेघर : अमेरिकेतील हवाई द्विपावर लागलेल्या या आगीत नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात लागलेल्या आगीतून नागरिकांना वाचवण्याची कसरत जवान करत आहेत. सध्या या परिसरातील 4 हजारापेक्षा जास्त नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मोठे नुकसान झाल्यामुळे अधिकाऱ्यांची धावाधाव होत आहे. या आगीसह इतर दोन आगी अमेरिकेच्या याच प्रांतात लागल्या होत्या, मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

  • अमेरिकेच्या क्लोक्वेट परिसरात 1918 मध्ये कॅम्प फायरमुळे भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल 85 नागरिकांचा बळी गेला होता. ही आग ग्रामीण परिसरात घुसल्याने हजारो नागरिकांना बेघर व्हावे लागले होते. अनेक नागरिकांची घरे जळून खाक झाल्यामुळे त्यांचा संसार धुळीस मिळाला होता.

हेही वाचा -

  1. कॅलिफोर्नियातील जंगलांमध्ये भीषण आग; आग अद्याप आटोक्याबाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.