उहाई सावन (थायलंड): ईशान्य थायलंडच्या (Thailand) ग्रामीण भागातील डे केअर सेंटरमध्ये गेल्या आठवड्यात सामूहिक हत्याकांड झाले होते (day care center mass killing). मंगळवारी संध्याकाळी या हत्याकांडात मरण पावलेल्या लहान मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी पीडितांचे कुटुंब आणि शेकडो लोक एकत्र जमले. उथाई सावन शहरातील यंग चिल्ड्रेन डेव्हलपमेंट सेंटरपासून थोड्या अंतरावर असलेल्या एका बौद्ध मंदिरात हा अंत्यसंस्काराचा विधी पार पडला. याच ठिकाणी गुरुवारी एका माजी पोलीस अधिकाऱ्याने लहान मुलांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
थायलंडच्या इतिहासातील सर्वात मोठे हत्याकंड: गेल्या गुरुवारी घडलेली ही घटना थायलंडच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे हत्याकांड होते. या हत्याकांडात माजी पोलीस सार्जंट पन्या कामरापने स्वत:चा जीव घेण्यापूर्वी लहान शेतकरी समुदायातील 36 जणांना मारले, त्यापैकी 24 मुले होती. या पोलीस अधिकाऱ्याला वर्षाच्या सुरुवातीलाच अवैधरित्या ड्रग्ज वापरल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.
जड अंत:करणाने निरोप: बहुतेक पीडितांसाठी तीन मंदिरांमध्ये संयुक्त समारंभ आयोजित करण्यात आला होता. रॅट समकी मंदिराचे मठाधिपती फरा क्रु अदिसल किज्जानूवत यांनी सांगितले की, त्यांच्या मंदिरात 19 मृतांपैकी 18 मुलांचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. मोठ्या जनसमुदायासह संन्यासी हळू हळू मंदिराच्या सभामंडपातून बाहेर पडत होते. मृतकाच्या प्रत्येक कुटुंबा सोबत एक साधू होता, त्यांच्या मागे शवपेटी घेऊन पोलिस होते. विटांनी बांधलेल्या शवगारात शवपेटी ठेवल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. अनेक पीडित नातेवाईकांनी त्यांच्या प्रियजनांची छायाचित्रे शवपेटींवर ठेवली. काही कुटुंबातील सदस्यांनी लहान मुलांची खेळणीही सोबत ठेवली होती.