ETV Bharat / international

अमेरिकेत 18 वर्षीय शूटरचा शाळेत अंदाधुंद गोळीबार एका शिक्षकासह १८ जण ठार, हल्लेखोराची आत्महत्या - टेक्सासमध्ये एका शिक्षकासह १४ मुले ठार

टेक्सासच्या प्राथमिक शाळेत एका 18 वर्षीय बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात किमान 18 मुले ठार झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की बंदूकधारीही यात ठार झाला. मृतांच्या संख्येत तीन वयस्क व्यक्तींचाही समावेश आहे.

one teacher killed in Texas school shooting
अमेरिकेत 18 वर्षीय शूटरचा शाळेत अंदाधुंद गोळीबार एका शिक्षकासह १४ मुले ठार
author img

By

Published : May 25, 2022, 7:01 AM IST

Updated : Jun 28, 2022, 9:36 AM IST

टेक्सास (यूएसए): मंगळवारी टेक्सासच्या प्राथमिक शाळेत एका 18 वर्षीय बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात किमान 18 मुले ठार झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की बंदूकधारीही यात ठार झाला. मृतांच्या संख्येत तीन प्रौढांचाही समावेश आहे. राज्याचे सिनेटर रोलँड गुटेरेझ यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना पोलिसांनी मृत्यूबद्दल माहिती दिली होती. पण त्यामध्ये सुरुवातीला हल्लेखोराचा समावेश होता की नाही हे लगेच स्पष्ट झाले नाही.

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी सांगितले की प्राथमिक शाळेतील नेमबाजाने जो उवाल्डेचा आहे त्याने हे निर्घृण कृत्य केले. "अशी माहिती मिळत आहे की त्याने आपले वाहन सोडले पार्क केले आणि हँडगनसह तो येथील रॉब प्राथमिक शाळेत घुसला. त्याच्याकडे रायफल होती अशीही माहिती मिळत आहे. परंतु त्याची अजून शहानिशा करणे बाकी आहे, असे म्हणाले. स्कूलमध्ये झालेल्या गोळीबारानंतर शाळा बंद करण्यात आली.

भ्याड हल्ला - ग्रेग अबॉट यांनी हा हल्ला अत्यंत जीवघेणा मानला आहे. त्यांच्या दृष्टीने उवाल्डे हे अगदी लहान शहर आहे, जिथे आरोपीने हा भ्याड हल्ला केला त्या शाळेमध्येही केवळ 600 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. त्याने हल्ल्याची तुलना 2012 च्या सॅंडी हूक एलिमेंटरी स्कूल शूटिंगशी केली. पण त्यांनी हे टेक्सास शूटिंग अधिक घातक आणि चिंताजनक मानले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी शूटरने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्गात शिकणाऱ्या निष्पाप मुलांना आपल्या गोळीने लक्ष्य केले आहे. 2012 च्या घटनेतही 20 मुलांना अशाच प्रकारे जीवे मारण्यात आले होते.

कनेक्टिकट हल्ल्याची आठवण - ळपास एक दशकापूर्वी कनेक्टिकटमधील न्यूटाऊन येथील सॅंडी हूक एलिमेंटरी येथे बंदुकधारींनी 20 मुले आणि सहा जणांना ठार मारल्यानंतर यूएस ग्रेड स्कूलमधील ही सर्वात प्राणघातक गोळीबार आहे. बॉडी आर्मरमध्ये बंदुकधारी व्यक्तीने बफेलो, न्यूयॉर्क येथील एका सुपरमार्केटमध्ये 10 कृष्णवर्णीय दुकानदार आणि कामगारांना ठार मारल्यानंतर केवळ 10 दिवसांनी हे घडले. अधिकाऱ्यांच्या मते हा वर्णद्वेषी हल्ला होता. अधिकार्‍यांनी सांगितले की मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी घटनास्थळ घेरले - सध्या पोलीस घटनास्थळी उपस्थित असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या गोळीबारात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. सध्या राज्यपालांच्या आदेशानंतर टेक्सासच्या रेंजर्सनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. स्थानिक पोलिसांकडूनही सहकार्य घेतले जात आहे.

अध्यक्ष बिडेन यांनीही घेतली दखल - त्याचवेळी अशीही बातमी आहे की, लवकरच राष्ट्राध्यक्ष जो बिडेन या गोळीबाराच्या घटनेवर निवेदन जारी करणार आहेत. प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना या भीषण हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना प्रत्येक अपडेटची माहिती सतत दिली जात असते.

  • US President Joe Biden spoke with Texas Governor Greg Abbott to offer any and all assistance he needs in the wake of shooting at Robb Elementary School in Uvalde, TX which killed 14 students and 1 teacher. pic.twitter.com/EcQXmVRqIm

    — ANI (@ANI) May 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Jun 28, 2022, 9:36 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.