काबूल (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सोमवारी सशस्त्र युवकांनी एका हॉटेलमध्ये गोळीबार केला. (firing in hotel in Kabul). या हॉटेलमध्ये परदेशी नागरिक खासकरून चिनी नागरिक वारंवार भेट देतात. रॉयटर्स वृत्त एजन्सीने दोन तालिबानी आणि स्थानिक रहिवाशांचा हवाला देऊन हे वृत्त दिले आहे. शहार-ए-नाऊ परिसरातील रहिवाशांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एका शक्तिशाली स्फोटानंतर या भागात गोळीबार सुरू झाला. (Kabul Attack).
आधी स्फोट आणि नंतर गोळीबार झाला : परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, हा हल्ला ज्या हॉटेलमध्ये करण्यात आला तेथे चिनी आणि इतर परदेशी लोकं सहसा जातात. तसेच टोलोन्युज या वृत्तसंस्थेनी देखील या बातमीची पुष्टी करत ट्विट केले की, "काबुलच्या शहार-ए-नाऊ भागातील रहिवाशांनी पुष्टी केली आहे की त्यांनी स्फोट आणि त्यानंतर गोळीबार ऐकला. सुरक्षा अधिकार्यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही."
हा स्फोट अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक गेटजवळ मोर्टार उतरल्यानंतर झालेल्या घटनेच्या एक दिवसा नंतर झाला आहे. या घटनेत 4 लोकांचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले होते. स्पिन बोल्डक हे अफगाणिस्तानच्या दक्षिण कंदाहार प्रांतातील पाकिस्तानच्या सीमेजवळील एक सीमावर्ती शहर आहे. ट्विटरवर टोलो न्यूजने माहिती दिली की, "स्पिन बोल्डक गेटजवळ मोर्टार पडल्यानंतर किमान चार लोक ठार आणि इतर 20 जण जखमी झाले आहेत".