नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये लडाखच्या भूभागावरुन चांगलाच वाद सुरू आहे. मात्र या दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झाली. या चर्चेत पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष सीमा रेषेवरुन सैन्य मागे घेण्याच्या प्रस्तावावर खुलेपणाने चर्चा करण्यात आली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेनंतर आता मात्र परिस्थिती बदलली असून दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्याचे ठरवले आहे.
-
27th Meeting of Working Mechanism for Consultation and Coordination on India-China Border affairs held today
— ANI Digital (@ani_digital) May 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/F5ykTFjY9c#India #China #WMCC pic.twitter.com/ZFf6sqoPz2
">27th Meeting of Working Mechanism for Consultation and Coordination on India-China Border affairs held today
— ANI Digital (@ani_digital) May 31, 2023
Read @ANI Story | https://t.co/F5ykTFjY9c#India #China #WMCC pic.twitter.com/ZFf6sqoPz227th Meeting of Working Mechanism for Consultation and Coordination on India-China Border affairs held today
— ANI Digital (@ani_digital) May 31, 2023
Read @ANI Story | https://t.co/F5ykTFjY9c#India #China #WMCC pic.twitter.com/ZFf6sqoPz2
शांतता प्रस्तापीत करण्यावर दोन्ही बाजूंचा भर : गलवान खोऱ्यात झालेल्या सैनिकांच्या धक्काबुक्कीत दोन्ही देशांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. यात भारतीय जवानांनाही वीरमरण आले होते. मात्र ही हानी टाळण्यासाठी आता दोन्ही देशांच्या सरकारने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. शांतता प्रस्थापीत करण्यासाठी दोन्ही देशांकडून आग्रह धरण्यात येत आहे. भारत-चीन सीमा प्रकरणांवर (WMCC) सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यरत समितीची 27 वी बैठक 31 मे 2023 रोजी नवी दिल्ली येथे झाली आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले निवेदन : परराष्ट्र मंत्रालयाचे पूर्व आशियाच्या संयुक्त सचिवांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. चीनी शिष्टमंडळाचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि महासागर व्यवहार विभागाचे महासंचालकांनी केले. दोन्ही बाजूंनी भारत-चीन सीमा भागातील पश्चिम सेक्टरमधील एलएसी बाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे.
लवकरच होणार वरिष्ठ कमांडर स्तरावरील बैठक : या बैठकीत उर्वरित भागातून माघार घेण्याच्या प्रस्तावावर स्पष्टपणे चर्चा करण्यात आली. त्यासाठी विद्यमान द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलच्या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठ कमांडर्सची पुढील बैठक लवकर घेण्याचे मान्य केले.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर बदलली परिस्थिती : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हालचालींमुळे भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय आणि अनेक चीनी सैनिक मारले गेले. तेव्हापासून सीमेवर सतत तणाव आहे. मात्र गलवान खोऱ्यातील घटनेनंतर आता परिस्थिती बदलली आहे.
एलएसीवरील शांतता प्रस्थापीत करणे गरजेचे : योग्य सीमारेषा निश्चित करू इच्छित असल्याची भूमिका चीनने वारंवार स्पष्ट केली आहे. एलएसीवर LAC शांतता प्रस्थापित होईपर्यंत चीनशी संबंध सामान्य होऊ शकत नाहीत, असे भारताने अनेक जागतिक मंचांवर स्पष्ट केले आहे. LAC वरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये 23 एप्रिल रोजी वरिष्ठ कमांडर्सच्या चर्चेची 18 वी फेरी झाली. यापूर्वी सीमा विवादावर चर्चा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी डिसेंबर 2022 मध्ये कोअर कमांडर्समध्ये चर्चा करण्यात आली होती.
हेही वाचा -