ETV Bharat / international

Earthquake In New Zealand : न्यूझीलंडजवळील कर्माडेक बेटांवर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामी येण्याची शक्यता

न्यूझीलंडजवळील केरमाडेक बेटांवर 7.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप 10 किमी खोलीवर झाला.

Earthquake In New Zealand
न्यूझीलंडजवळील कर्माडेक बेटांवर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप
author img

By

Published : Mar 16, 2023, 9:35 AM IST

वेलिंग्टन : न्यूझीलंडमध्ये 7.1 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, न्यूझीलंडच्या केरमाडेक बेटांवर 7.1 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. 10 किमी खोलीवर भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतक्या शक्तिशाली भूकंपामुळे किती नुकसान झाले हे अद्याप समोर आलेले नाही, परंतू तपासणी सुरू आहे.

त्सुनामी येण्याची शक्यता भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली : यूएसजीएस (USGS) च्या मते, गुरुवारी सकाळी न्यूझीलंडच्या उत्तरेकडील केर्मडेक बेटांवर 7.1 रिश्टर स्केलचा हादरा जाणवला. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात भूकंप झाला, अशा स्थितीत भूकंपाच्या केंद्रापासून सुमारे 300 किलोमीटरच्या त्रिज्येत त्सुनामी येण्याची शक्यता भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भूकंप 10 किमी खोलीवर होता. इंटरनॅशनल त्सुनामी वॉर्निंग सिस्टम (TWS) नुसार, भूकंपानंतर लगेचच सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया किंवा फिलिपाइन्सला सुनामीचा धोका नाही.

बेघर लोकांना मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले : 6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 50,000 च्या पुढे गेली आहे. कोसळलेल्या इमारतींमधून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये मदतकार्य सातत्याने सुरू आहे. मात्र, आता ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत असण्याची आशा कमी आहे. त्याचबरोबर लाखो बेघर लोकांना मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.

50 हजार लोकांच्या मृत्यूची शक्यता : माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये 1 लाख 60 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत किंवा गंभीरपणे नुकसान झाले आहे. सुमारे 5 लाख अपार्टमेंट्स नष्ट झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आधीच सुमारे 50 हजार लोकांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली होती, फक्त तुर्कीमध्ये 44 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मोछ्या प्रमाणात हानी झालेली आहे. अलीकडच्या काळात भूकंपाचे प्रमाण वाढलेले आहे.

हेही वाचा : Mumbai Crime : आईची हत्या करुन मृतदेहाच्या तुकड्यांसोबत राहात होती मुलगी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.